maharashtra

विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा


विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : विनयभंगासह मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास अजंठा चौक पुलाच्या खाली सुनिता आपल्या शिंदे राहणार तासगाव तालुका सातारा यांना मारहाण करीत त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी अनुसन पितांबर शिंदे, मेरनाम पितांबर शिंदे, उत्तेकर पितांबर शिंदे, काजल मेरनाम शिंदे, पितांबर चिलबिल्या शिंदे (सर्व राहणार सातारा) आणि सोनबाला डिटेल काळे, डिटेल कापीत काळे, गुंड्या कापीत काळे (तिघेही राहणार त्रिपुटी, तालुका कोरेगाव) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.