maharashtra

खासगी सावकारी प्रकरणी दोघांवर गुन्हा


खासगी सावकारी प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : खासगी सावकारी प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्काताई मोहन चव्हाण वय 40, रा. उंब्रज, ता. कराड यांनी रविंद्र एकनाथ थोरात रा. कोर्टी, उंब्रज, तालुका कराड यांच्याकडून 50 हजार रुपये दरमहा सावकारी 15 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. तसेच बाळकृष्ण सुरेश जाधव राहणार चरेगाव, तालुका कराड यांच्याकडून 15 टक्के व्याजाने 10 हजार रुपये घेतले होते, यांचे दोन महिना व्याज थकीत राहिल्याने या दोघांनी चव्हाण यांच्या घरी जात दमदाटी केली. तसेच चव्हाण यांचा मालट्रक क्र. एमएच 09 एफएल 2638 हा सोमवार दि. 6 मार्च रोजी परस्पर घेऊन गेलेले आहेत. याप्रकरणी थोरात व जाधव यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय जगदाळे करीत आहेत.