सदरबझार, सातारा येथून रस्त्याने निघालेल्या शकुंतला विश्वनाथ पवार वय ६0, रा. सदरबझार यांना रविवार, दि. २२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन युवकांनी पोलिस असल्याचे खोटे सांगून सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत वृध्देने तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सातारा शहरातील या वाढत्या घटनेने वृध्दांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा : सदरबझार, सातारा येथून रस्त्याने निघालेल्या शकुंतला विश्वनाथ पवार वय ६0, रा. सदरबझार यांना रविवार, दि. २२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन युवकांनी पोलिस असल्याचे खोटे सांगून सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत वृध्देने तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सातारा शहरातील या वाढत्या घटनेने वृध्दांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला सदरबझार येथील रस्त्याने चालत निघाल्या होत्या. त्यावेळी रस्त्याकडेला दोन जण दुचाकी लावून थांबले होते. त्यांनी पवार यांना अडवले. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. 'पुढे खून झाला आहे. एसपी साहेब तपासणी करत आहेत. तुम्ही इतके दागिने अंगावर घालून गेल्याचे त्यांनी पाहिले तर आमची नोकरी जाईल,' अशी बतावणी भामट्यांनी केली. दागिने बांधून देतो, असे सांगून संशयितांनी अंगावरील दागिने काढण्यास सांगितले. सुमारे साडेतीन तोळे वजनाचे दागिने काढल्यानंतर मात्र संशयितांनी हातचलाखीने दागिने स्वत:कडे ठेवले. अन कागदाच्या पुडीत दागिने बांधून दिल्याचे सांगितल्यानंतर तक्रारदार महिला तेथून घरी आल्या. त्यानंतर कागदाच्या पुडीमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये दोन बनावट बांगड्या व दगड दिसले. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.


