एकाला मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा : एकाला मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास विठ्ठल पोपट चव्हाण राहणार कामठी तालुका सातारा हा दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेला असता तेथीलच सुर्वेश शंकर यादव याने विठ्ठल याला काठीने मारहाण केली. तसेच त्याचा चुलता चांगदेव गुलाब यादव याने शिवीगाळ व दमदाटी करून विठ्ठलला मारहाण केली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पाटोळे करीत आहेत.


