maharashtra

संतोष सुतार यांना ओंड शिक्षण मंडळाचा प्रेरणा पुरस्कार प्रदान


Ond Shikshan Mandal Inspiration Award presented to Santosh Sutar
ओंड शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार  यावर्षी ओंड गावचे युवा उद्योजक संतोष सुतार यांना जाहीर झाला होता. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख प्रा. दिनकरराव थोरात यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

कराड : ओंड शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रेरणा पुरस्कार  यावर्षी ओंड गावचे युवा उद्योजक संतोष सुतार यांना जाहीर झाला होता. छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे माजी इतिहास विभागप्रमुख प्रा. दिनकरराव थोरात यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षण मंडळाचे संचालक बाबूभाऊ थोरात, शंकर थोरात, विजयसिंह थोरात, राजाराम थोरात, ग्रामपंचायत सदस्य सचिन थोरात, पोलीस पाटील विजय थोरात, अॅड. दीपक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
संतोष सुतार हे युवा उद्योजक असून त्यांच्या कार्याची व यशस्वी वाटचालीची ओंड शिक्षण मंडळाकडून दखल घेत संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. ओंड शिक्षण मंडळाकडून दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार यावर्षीचा पुरस्कार ओंड गावचेच सुपुत्र, युवा उद्योजक संतोष सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्धल युवा उद्योजक संतोष सुतार यांचे ओंड ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, मित्र परिवारासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.