maharashtra

सातारा शहरात 55 हजारांची घरफोडी


सातारा शहरात अज्ञात चोरट्याने 55 हजारांची घरफोडी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सातारा शहरात अज्ञात चोरट्याने 55 हजारांची घरफोडी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 फेब्रुवारी रोजी आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. शितल चैतन्य जोशी यांच्या देशमुख कॉलनी, सदर बाजार, सातारा येथील घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून रोख रक्कम आणि चांदीची नाणी असे मिळून एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. एच. गायकवाड करीत आहेत.