maharashtra

चाफळ येथे सापडलेल्या दुर्मिळ जातीच्या कासवाला मिळाले जीवनदान


A rare species of tortoise found at Chafal received a lifeline
अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या कासवाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते. मऊ पाठीच्या या कासवाचे शास्त्रीय नाव लिथस सॉफ्टशेल टरटल असे असून हे कासव गोड्या पाण्यातील सर्वात मोठे कासव आहे. याचे वजन ३० ते ३२ किलोपर्यंत वाढते. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येत असल्याची माहिती वनरक्षक विलास वाघमारे यांनी दिली.

पाटण : अत्यंत दुर्मिळ जातीचे व गोड्या पाण्यातील सर्वात मोठे असणारे व मऊ पाठ असणारे कासव माजगाव चाफळ रोडवरील ओढ्याच्या काठावर विलास गायकवाड या शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. संबंधित शेतकऱ्याने वन विभागाशी संपर्क साधल्याने वन विभागाने या दुर्मिळ कासवाची वैद्यकीय तपासणी करून त्यास उत्तरमांड धरणात सोडून त्यास जीवदान दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, माजगाव रोडवर विलास गायकवाड हे शेतकरी चालत निघाले असता ओढ्याच्या कडेला हे कासव दिसले. त्यांनी लागलीच चाफळ बिटाचे वनरक्षक विलास वाघमारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानुसार अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या कासवाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते. मऊ पाठीच्या या कासवाचे शास्त्रीय नाव लिथस सॉफ्टशेल टरटल असे असून हे कासव गोड्या पाण्यातील सर्वात मोठे कासव आहे. याचे वजन ३० ते ३२ किलोपर्यंत वाढते. साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येत असल्याची माहिती वनरक्षक विलास वाघमारे यांनी दिली.