पोलिसांनी जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून देशी व हातभट्टी असा एकूण ५७ हजार २१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा : पोलिसांनी जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून देशी व हातभट्टी असा एकूण ५७ हजार २१० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिस्कळ, ता. खटाव गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या आडोशाला श्रीरंग सिताराम कोरडे, रा. काटेवाडी, ता. खटाव याच्याकडुन १ हजार ५०, नेर, ता. खटाव गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या आडोशाला तेथीलच विजय रवींद्र चव्हाण याच्याकडुन १ हजार ५४०, मालगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच अल्ताफ पटेल याच्याकडून १ हजार १२० रुपये किमतीची देशी दारू तसेच सांगवी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत कॅनॉल कडेला तेथीलच सुरज प्रताप कुंभार याच्याकडुन ३५ लिटर हातभट्टीची दारू व एक दुचाकी असा ५३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.


