Khatav

esahas.com

मनोज पवार यांचा एकाच दिवशी तब्बल नऊ अंत्यसंस्कारास हातभार

कोरोना महामारीमुळे बहुतांशी लोक स्वतःचा जीव मुठीत घेऊन घरी बसले आहेत. तर दुसर्‍या बाजूला काहीजण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा पैकीच एक आहेत वडूज नगरपंचायतीचे शववाहिनेचे चालक मनोज पवार. त्यांनी रविवारी एकाच दिवशी सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत तब्बल 9 कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. 

esahas.com

संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याचे पालन करणे गजजेचे

‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणाला बहुमोल असे संविधान दिले आहे. त्या संविधानातून निर्माण झालेल्या कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळेच आज सर्व भीम अनुयायी शांततेच्या मार्गाने भीमजयंती साजरी करत आहेत, ही खरोखरंच अभिमानाची गोष्ट आहे,’ असे मत बाळासाहेब कांबळे यांनी व्यक्त केले.

esahas.com

डॉ. आंबेडकरांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद मिळेल

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अथक जीवन कार्य म्हणजे असामान्य कर्तृत्वाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद आणि सामर्थ्य प्राप्त होते आहे,’ असे मत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. दीपा श्रावस्ती यांनी व्यक्त केले.  

esahas.com

मोळ येथे वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस; शेतीपिकांचे नुकसान

मोळ (ता. खटाव) व  डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

esahas.com

डाळमोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज खटाव तालुक्यातील डाळमोडी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

esahas.com

पारगाव येथील तलावाची ना. बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी येथील तलावाची पाहणी करून, उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.

esahas.com

बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई

पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

esahas.com

गुरसाळे येथे आगीत लाखोंची वित्तहानी

गुरसाळे (ता. खटाव) येथील डॉ. प्रशांत लक्ष्मण गोडसे यांच्या शेतास अचानक आग लागून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांची वित्तहानी झाली आहे.

esahas.com

पुसेगावात विनामास्क फिरणार्‍यांना पोलिसांचा दंडुका

प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून पुसेगावसह परिसरात विनामास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. 

esahas.com

वडगाव येथे शॉट सर्किटमुळे ऊस जळून खाक; दोन लाख वीस हजारांचे नुकसान

वडगाव (ज. स्वा) येथील शेतकरी राजकुमार तुकाराम घार्गे व नंदकुमार मारुती नागमल यांची वडगाव ते गोरेगाव रस्त्यालगत शेती आहे. काल रात्री 8:45 वाजता त्या लाईनवरती शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतामध्ये असलेला ऊस जळून खाक झाला.