‘कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यात मुलांना कोठेही जाण्याचे फिरण्याचे बंद असल्याने त्यांचे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य सुरळीत करण्यास नृत्य किती फायदेशीर आहे. नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होत असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींनी नृत्य केल्यास आपले स्वास्थ्य निरोगी राण्यासाठी मदत होईल,’ असे मत यावेळी अभिनेता दिग्दर्शक महेश सोनावणे यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींच्या पाचगणी येथील वास्तव्याच्या स्मृती हा पाचगणीकरच नव्हे, तर महाराष्ट्रवासीयांसाठी एक अभिमानाचा क्षण नी आठवणींचा ठेवा. या सुखद स्मृतींचा सुगंध जतन करण्याच्या हेतूने पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी टाकाऊ बांधकाम साहित्य वापरून गांधीजींच्या 8 फूट उंच प्रतिमेची निर्मिती करण्याच्या संकल्प केला. त्यामुळे इमारत बांधकामातील भंगार, टाकाऊ सामान, राडारोडा यांचा पुनर्वापर करून गांधीजींचे आणि स्वच्छतेचे असलेले सर्वश्रूत नाते अधोरेखित केले आहे.
खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, तालुक्यातील शेतकर्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी आज नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
स्व. आप्पासाहेबांच्या विचारांचा वारसा ही संस्था जोपासत असून, कृष्णा बँकेचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रात करण्याचा आमचा मनोदय आहे. येणाऱ्या ३ वर्षात कृष्णा आर्थिक परिवार २००० कोटींचा टप्पा गाठेल - डॉ. अतुल भोसले
मालखेड ता.कराड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आ.पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त व पै.सौरभ माने यांच्या स्मरणार्थ भव्य वन हाफ पिच टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२० मार्चेपासून या स्पर्धे होणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.प्रथम क्रमांक ११,१११ विक्रम शिवदास व देवदास माने यांच्याकडून ,द्वितीय क्रमांक ७,७७७ सरपंच इंद्रजित ठोंबरे ,उप...
‘जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते यांना टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे, अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
येथील सैनिक स्कूल कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी आज सैनिक स्कूलच्या पाहणी दरम्यान सांगितले.
फलटण शहर व तालुक्यातील विकासकामांसाठी नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 274 कोटींची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. तर फलटण-सातारा रस्त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक निधीतून 176 कोटींची तरतूद करण्यात आली असून, यातून या संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल भरण्यास प्रेरित करून थकीत ग्राहकांचे वीजबिल भरून घेण्यात येत आहे. तसेच थकीत वीजबिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, खटाव तालुकाप्रमुख दिनेश देवकर यांच्यासह शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महावितरण अधिकार्यांची वागणूक उर्मट असून पदाधिकार्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळेच उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला. जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार या शिवसैनिकांवरती जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे यासारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पोलीस यंत्रणेने सखोल तपास करून जनतेसाठी झटणार्या शिवसैनिकांना न्याय द्यावा,