yatra

esahas.com

वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी

वाढोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बनवडीच्या श्री वाढसिद्धनाथाची बगाड यात्रा उत्साहात साजरी; दर्शनासाठी उसळली भाविकांची मोठी गर्दी

esahas.com

सातारा जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान आजादी गौरव यात्रा

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर आजादी गौरव पदयात्रेचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजादी गौरव यात्रा निघणार आहे .

esahas.com

अमरनाथ यात्रेतील सातारकर सुरक्षित

अमरनाथ येथे दोन दिवसांपूर्वी अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाली. यामध्ये असंख्य लोक अडकले. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसारित होताच अनेकांनी या जम्मू-काश्मिर येथील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सातारकर यांच्याशी मोबाईलवरुन थेट संपर्क साधला. त्यावेळी सर्वजण सुरक्षित असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

esahas.com

'काशीनाथाचं चांगभलं' च्या गजरात मोठ्या उत्साहात बावधनच्या भैरवनाथाची बगाड यात्रा साजरी

'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.

esahas.com

श्री यमाई देवी यात्रेतील छबिना, दीपोत्सव, रथोत्सव रद्द

औंध, ता. खटाव येथील श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्ताने काढण्यात येणारा छबिना, दीपोत्सव, रथोत्सव यावर्षी आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी दिली.

esahas.com

पाल येथील यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

पाल तालुका कराड येथील श्री खंडोबा देवाची यात्रा दि. 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 या कालावधीत संपन्न होणार असून कोरोना आणि ओमायक्रान च्या अनुषंगाने ही यात्रा प्रशासनाच्या नियमावलीनुसार साजरी करण्यात येणार आहे. यात्रेनिमित्त पोलीस अधिक्षक अजय बंसल यांच्या सूचनेवरून वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

esahas.com

श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुसेगावात निर्जंतुकीकरण मोहीम

पुसेगाव, ता. खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी संपूर्ण गावामध्ये "निर्जंतुकीकरण मोहीम" राबविण्यात आली. श्री सेवागिरी महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मशीनच्या साहाय्याने औषध फवारणी करून हे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

esahas.com

पुसेगांव येथील श्री सेवागिरी यात्रेनिमित्त रथोत्सव मिरवणूक रद्द

सातारा जिह्यातील पुसेगाव, ता. खटाव येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त रथोत्सव मिरवणुक कार्यक्रम रद्द करण्यात आला असुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून निर्बंध लागू करत प्रवेश बंद व वाहतुक व्यवस्थेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

esahas.com

म्हसवड यात्रा अखेर रद्द; लांबूनच मिळणार रथाचे दर्शन

म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

esahas.com

जयहिंद फौंडेशनच्या शौर्याजंली यात्रेचे कराडमध्ये जंगी स्वागत

१९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले.

esahas.com

पाडळीतील मानाच्या सासनकाठीचे पूजन 

पाडळी (निनाम, ता. सातारा) येथील मानाच्या सासनकाठीचे तसेच पोषाखाचे आज  पारंपरिक प्रथेनुसार पूजन करण्यात आले. मात्र, सध्याच्या कोरोनाजन्य परिस्थितीमुळे वाडी रत्नागिरीकडे होणारा प्रस्थान कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

esahas.com

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोडोली येथील भैरवनाथची यात्रा रद्द

गोडोली गावाची यात्रा दरवर्षी उत्साहाने साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा शिरकाव गोडोलीत होवू नये, याची काळजी घेण्यासाठी यंदा गोडोलीची यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गोडोली यात्रा कमिटी आणि शहर पोलीस ठाणे यांच्या बैठकीत झाला. गोडोलीचे देवस्थान भैरवनाथाचे मानकरी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी ही माहिती दिली.