अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे एक दिवसीय धरणे आंदोलन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेली आरपारची लढाई धारदार झाली आहे. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत असून दिवसेंदिवस सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर बसलेल्या उपोषणकर्त्यांना समाजाच्या विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.
विवर ता. महाबळेश्वर येथील शासकीय पिण्याच्या पाण्यावर (उपसरपंच) अनिल विठृठल कदम, मारूती यशवंत कदम, धोंडीबा यशवंत कदम, दगडु लक्ष्'ण कदम, गुणाजी यशवंत कदम या इसमांनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यावर अतिक्रमण केले आहे म्हणून ग्रामस्थांनी दि. 13/04/2023 रोजी सरपंच ग्रामपंचायत तळदेव यांना लेखी तक्रार
सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.
सातारा शहरालगतचे उपनगर असलेल्या खेड मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी येत नसल्याने हजारो लोकांची गैरसोय झाली असून त्यांना ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
खेड मंडलाधिकार्यांच्या मनमानी कारभाराला जिल्हा प्रशासनाने चाप लावण्याची गरज निर्माण झाली असून या भ्रष्ट अधिकार्याला पदमुक्त करुन तेथे एखाद्या प्रामाणिक अधिकार्याची नेमणूक करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड च्या वतीने सातारा जिल्ह्यामध्ये फोर-जी आणि फाईव्ह-जी सेवा सुरू करण्यात येत असून पहिल्या टप्प्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील 178 गावांमध्ये फोर-जी सेवा सुरू करण्यात येणार आहे.
दुघी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थातर्फे 15 टक्के अनुदानासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन देवून हे आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्याचा मान राखून नागझरी ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.
जकातवाडी गावच्या हद्दीत फोन्टशीरसर, ता. माळशिरस येथील युवकाचा जकातवाडी गावच्या हद्दीत मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मलवडी, ता. माण गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून मलवडी गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून ३ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करत जुगाराच्या साहित्यासह मोबाइल, दुचाकी जप्त केल्या.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व आले पिकाच्या व्यापारासाठी अग्रगण्य बाजारपेठ म्हणून खेड नांदगिरी गावची ओळख. गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सर्वच राजकीय नेतेमंडळीसह ग्रामस्थांनी पक्ष विरहित एकत्र येऊन केला. अन् म्हणतो ना 'गाव करी ते राव काय करी' तसचं घडलं.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ग्रामसेवकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉलमध्ये अनोळखी अंदाजे 25 ते 30 वर्षाचा पुरुष जातीचा मृतदेह आढळला.
परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी ३३, हजार ८८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. हे वाढे गावाने दाखून दिले असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट विसरुन व सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील पुस्तकांचे गाव भिलारला भेट दिली.भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तके ठेवण्यात आली आहे. भिलार हे आदर्श गाव असून या गावात आल्याचा आपणास आनंद झाला असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपट दाखविण्यात आला. प...
कराडवाडी, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अज्ञात महिलेचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील कोअर झोनमधील मौजे वेळे ता.जावली जि. सातारा या गावचे पुनर्वसन होणार हे निश्चित आहे. तरी वेळे गावातील संबंधितांनी पुनर्वसनकामी उपवनसंरक्षक (प्रा) सातारा या कार्यालयास त्वरीत संपर्क साधावा. वेळेत संपर्क न साधल्यास, पुनर्वसन प्रक्रियेस विलंब झाल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे प्रकल्प अधिकारी तथा उपवन संरक्षक एम. एन. मोहिते यांनी कळविले आहे.
कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत एकाला तीन जणांनी धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
बुध, ता. खटाव गावच्या हद्दीत वाळू चोरी केल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून डंपरसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नागठाणे, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी चक्री जुगार अड्डयावर छापा टाकून ७१ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत हस्तगत केला. त्यामध्ये रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी, कॉम्प्यूटर, माऊस, राऊटर, सीपीयु असा समावेश आहे.
पांढरवाडी, ता. खटाव गावच्या हद्दीत पोल्ट्रीच्या शेडमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून ४ चारचाकी वाहने, ७ दुचाकी, ११ मोबाइल्स, तलवारी व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ९८ हजार ६९० मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत २० जणांवर पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
सातारा - जांभे मार्गावर बोरणे गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात माजी लष्करी अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा तालुक्यातील मिलिटरी अपशिंगे या गावामध्ये रशियन बनावटीचा रणगाडा दाखल झाला आहे. युद्धातील स्मृती जपण्या करता या रणगाड्याला गावात ठेवणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यामुळे मिलिटरी अपशिंगे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
करंजे, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून ग्रामस्थांनी हटकल्यानंतर युवकांनी पलायन केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अनुषंगाने हाणामारी करणाऱ्या इसमांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एस. जे. पतंगे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या गावात त्यांच्याच विचारांची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक यांनी अधिकाराचा गैरवापर करुन चुकीच्या ठरावाने घराची नोंद केली आहे. सभापतींचे पती संभाजी इंदलकर हे म्हणतात की दोन्ही महाराज हे माझ्या खिशात आहेत. काहीच कोणी करु शकत नाहीत, याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बजरंग श्रावण अंबुले यांनी केली आहे.
खोकडवाडी, (कोडोली) ता. सातारा गावच्या हद्दीत अज्ञात दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महागाव, ता. सातारा गावच्या हद्दीत रेल्वे मालगाडीच्या समोर अचानक काही म्हैशी आल्यामुळे चालकाने रेल्वे मालगाडीला अचानक ब्रेक लावला. मात्र या अपघातात एका म्हैशीचा मृत्यू झाला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळत अन्य म्हैशी किरकोळ जखमी झाल्या.
खोटी ॲट्रॉसिटी व गावावर दहशत निर्माण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ढाकणी, ता. माण येथील ग्रामस्थांची जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजना महाराष्ट्रातील ७ जिल्हयामध्ये राबविली जात असून सातारा जिल्हयातील खटाव, माण व वाई तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. सध्या खटाव तालुक्यातून या ग्रामस्तरीय शिबिराचा प्रारंभ झाला झाला असून खटाव तालुक्यातून या योजनेत ३२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती अटल भूजल योजनेचे कनिष्ठ भू वैज्ञानिक एम. एम. गडकरी यांनी भुरकवडी ता. खटाव येथे संपन्न झालेल्या अटल भूजल योजनेच्या शिबीरावेळी दिली.
मौजेमळा, कोळणे व पाथरपुंज येथील 325 खातेदारांचे पुनर्वसनं गेल्या छत्तीस वर्षापासून चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमुळे करण्यात आलेले नाही. राज्य शासनाने हा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आम्ही या क्षेत्रातील वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक करून असहकार आंदोलनं करू, असा इशारा पुनर्वसन कृती संघर्ष समितीचे समन्वयक संजय यशवंत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत महिलेचा झालेल्या खुनाचा गुन्हा चार तासात उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. शरद हणमंत ताटे, वय ३३, रा. येरावळे, ता. कराड असे अटक केलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. तर खुन झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळुंखे, वय ३०, रा. महिंद, ता. पाटण असे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत नदीपात्रामध्ये एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला.
‘वासुदेव आला हो... वासुदेव आला..., सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला हो..., वासुदेव आला... हे गाणं ऐकले की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभे राहते.
स्मार्ट व्हिलेज' स्पर्धेत खटाव तालुकास्तरावर सर्वाधिक गुण मिळवत नागनाथवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचे दहा लाखांचे पारितोषिक पटकावले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शासनाची ही स्मार्ट व्हिलेज योजना आहे. नागनाथवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचा सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
ग्रामविकास मंत्रालयाचा महत्वपूर्ण निर्णय
एस. टी. महामंडळाचे राज्य शासनाने विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपासले आहे. या संपाचा आज अकरावा दिवस आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरुच असली तरी विविध गावांनी व संघटनांनी या संपास लेखी पाठींबा दिला आहे.
कराड येथील बुधवार पेठ, नगरपालिका चौक परिसरात बेकायदा व बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगझिनसह बाळगणाऱ्यास शहर पोलिसांनी अटक करुन गजाआड केले. शनिवारी ६ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरु असलेला वावर अद्यापि कायम आहे. बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता कॅमेरे लावले आहेत.
जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं गर्दीची ठिकाणं असलेली शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण हेच शिक्षण ‘सावरी’ या दुर्गम गावातील मुलांसाठी नेटवर्कअभावी गैरसोईचं ठरतंय. त्याच मुलांची ही खडतर कहाणी...
‘चितळीतील कार्यकर्ते जिद्दीचे व चिकाटीचे आहेत. मागील निवडणुकीत दिलेल्या मताधिक्यामुळे वाडीवस्तीत विकासाची कामे करून त्यातून उतराई होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नशील आहोत. गावातील विकासगंगेत जे या विकासापासून दूर राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन विकासकामातून चितळीत परिवर्तन करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले.
देऊर, ता. कोरेगाव येथील एकाच दिवशी 23 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने, गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. एकट्या गावाचा एकूण बाधितांचा आकडा 54 झाला आहे. अर्धशतकाच्या पुढे गेल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने गावासह भागात चिंतेचे वातावरण झाले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या शंभू महादेवाचे देवस्थान असलेल्या शिंगणापूरमध्ये लांब पल्ल्याच्या बसेस कायमच धावत असतात. मात्र, यंदा कोरोना महामारीने सर्वत्रच थैमान घातल्याने एसटीची सेवा सुमारे 5 महिन्यांपासून बंद होती.