thieves

esahas.com

कराडला दोन सोनसाखळी चोरट्यांना अटक

कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रयत्न करून सोनसाखळी जबरीने चोरणा-या सराईत दोन गुंडांना कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने जेरबंद करून त्यांच्याकडील हत्यार व रोकड, सोन्याची चेन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

esahas.com

चॉकलेट फॅक्टरीतील भंगार चोरांच्या आवळल्या मुसक्या

साखरवाडी, तालुका फलटण येथील चॉकलेट फॅक्टरी तील भंगार चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

esahas.com

मालगाव येथे चोरट्यांचा धुडगूस

मालगाव ता.सातारा येथे वृध्द दाम्पत्याच्या घरात घुसून तीन चोरट्यांनी धुडगूस घातला. दाम्पत्याला मारहाण करत त्यांच्या घरातून सुमारे 1 लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसर हादरला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

esahas.com

मोबाईल हॅक, तरुणीच्या Google Pay, PhonePe मधून पैसे गायब; चोरट्यांनी लाटले साडेतीन लाख

साताऱ्यात एका तरुणीची मोबाईल हॅक करुन मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. तरुणीच्या गुगल पे आणि फोन पे अकाउंटमधून दोन लाखांहून अधिकची रक्कम चोरी करण्यात आली आहे.

esahas.com

सराईत मोटर सायकल चोरटे जेरबंद

मोटर सायकल चोरून त्या परस्पर विकणाऱ्या दोन आरोपींना तुपेवाडी तालुका खटाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.

esahas.com

जिल्ह्यात इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद

सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून  2 लाख 36 हजार रुपये किमतीच्या 43 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

esahas.com

पोलिसाचेच घर चोरट्यांनी फोडले

शहरातील एका पोलिसाचेच घर चोरट्यांनी टार्गेट करून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले आहेत.

esahas.com

दोघा चोरट्यांनी हिसकावले महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञात दोन चोरट्यांनी पोबारा केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

उंब्रज येथील एटीएम चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

उंब्रज, तालुका कराड येथे एक महिन्यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपासानंतर अटक केली आहे.

esahas.com

सातार्‍यात चोरट्यांचा धुमाकूळ; भरदिवसा 13 तोळे दागिन्यांची चोरी

सातारा शहरातील पिरवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा कडी- कोयंडा तोडून घरातून 5 लाख रुपये किमतीचे तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. 20 रोजी भरदिवसा घडली आहे. सातार्‍यात चोरट्यांची दिवाळी झाली असून या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

esahas.com

नडशीत महिलेचे दागिने चोरट्यांनी पळवले

नडशी (कॉलनी, ता. कराड) येथे काल रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी विमल साहेबराव ढेकळे यांच्या घरात घुसून अंदाजे एक तोळे सोने लंपास केले. दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

esahas.com

पाटण तालुक्यात चोरट्यांनी बंद घरे फोडून मारला दागिन्यांवर डल्ला

पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. विभागातील जाळगेवाडी खालची-वरची, गमेवाडी, माथणेवाडी व माजगांव गावातील एकुण १५ बंद घरे फोडून १४.५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

esahas.com

वाई-पाचगणी घाटात अज्ञात चोरट्यांची लूटमार

वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण-भावंडांना दुचाकी आडवी मारून त्यांच्याकडून भर रस्त्यात गळ्यातील चैन, रोख रक्कम असा दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

वृद्धेच्या दागिन्यावर चोरट्यांचा डल्ला

सदरबझार, सातारा येथून रस्त्याने निघालेल्या शकुंतला विश्वनाथ पवार वय ६0, रा. सदरबझार यांना रविवार, दि. २२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन युवकांनी पोलिस असल्याचे खोटे सांगून सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत वृध्देने तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सातारा शहरातील या वाढत्या घटनेने वृध्दांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

esahas.com

शहरात चोरट्यांकडून महिला होताहेत टार्गेट

सातारा शहरात चोरट्यांकडून महिला टार्गेट होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वॉकींग करत असलेल्या महिलेचा मोबाईल व त्याच्या कव्हरमध्ये असलेली रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेली असून सलग घटना घडत असल्याने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अभिनेत्री गजानन खंडागळे (वय 38, रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

esahas.com

सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तीन वेगवेगळ्या परिसरातील घटनांमध्ये सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

esahas.com

शिरवळमध्ये भरदिवसा चोरट्यांचा धुमाकूळ...!!

येथील महावितरणमध्ये कार्यरत असलेले अधिकारी यांचे बंद फ्लॅटचे कुलुप तोडून एकुण अंदाजे तीन लाख ८१ हजार ५९४ रुपयाचे अंदाजे १० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले, तर याचबरोबर येथील मंडई कॉलनी व पवारवस्ती येथेही बंद फ्लॅट मधील कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली मात्र यातील किती मुद्देमाल गेला? याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालु होते. एकाच दिवशी तीन बंद फ्लॅट फोडुन चोरट्यांनी भरदिवसा शिरवळ मध्ये धुमाकुळ घातल्याची घटना घडली.

esahas.com

खा. उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्रमात चोरट्यांची दिवाळी

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून चोरट्यांनी दोन जणांच्या ३ लाख ८ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची चैन चोरून नेल्याच्या तक्रारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com

दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक

दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडून ३२ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

esahas.com

सातारा डि.बी. पथकाची दमदार कारवाई; चोरट्यासह 10 मोटारसायकली हस्तगत

सातारा शहरासह ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणार्‍या आशुतोष दिपक भोसले (वय 22, मूळ रा.कुशी ता.सातारा सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. संशयिताकडून तब्बल 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्याने या दुचाकी चोरी करुन विकल्याचे समोर आले आहे.

esahas.com

महामार्गावरील गॅस पाईपच्या कामावरील कामगारांना चाकू व कोयत्याच्या धाकाने चोरट्यांनी लुटले...!!

मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून लुबाडल्याची घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी त्या दोघांकडील सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला असून याबाबतची फिर्याद पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिसात दिली आहे.

esahas.com

मालखेडनजीक अज्ञात चोरट्यांनी पोकलॅन चालक व कामगाराला लुबाडले

मालखेड, ता. कराड येथे अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून पोकलॅन मशिनवरील परप्रांतीय चालकासह त्याच्या कामगाराकडून सुमारे 25 हजाराचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी 7 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घडली. याबाबत पारसनाथ आवधेश कुमार यादव यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

घरफोडी करून चोरट्यांनी चोरले 1 लाख 59 हजारांचे दागिने

खेड, ता. सातारा येथील गौरीशंकर हाईट मधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 1 लाख 59 हजाराचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

esahas.com

कार्वेत मेडीकलसह बंद घरावर चोरट्यांचा डल्ला

कार्वे, ता. कराड येथे चोरट्यांनी मेडीकल दुकानासह एका घरात डल्ला मारून सुमारे ५० हजाराचे साहित्य व ऐवज लंपास केला. बुधवारी २९ रोजी रात्री ही घटना घडली.

esahas.com

दुचाकी चोरट्यांना अटक

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. शुभम दीपक कडव आणि अनमोल महेंद्र कांबळे अशी अटक केलेल्याची नावे आहेत. एलसीबीने या दोघांनाही अधिक चौकशीसाठी मेढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

esahas.com

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरले ५० हजारांचे दागिने

खिंडवाडी, ता. सातारा येथील नीलेश नंदकुमार शिंगनापूरकर(वय ३६) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना दि. ११ रोजी मध्यरात्री घडली.

esahas.com

चार दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने मुसक्या; तीन दुचाकी जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) विविध केलेल्या कारवाईत चार दुचाकी चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी संबंधित दुचाकी वाठार, सातारा व नऱ्हे जि. पुणे येथून चोरल्या असल्याची कबुली दिली असून यातील काहीजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

esahas.com

सैनिक स्कूलमधील चंदनाचे झाड चोरीस

येथील सैनिक स्कूलमधील सात फूट चंदनाचे झाड अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवार, दि. 5 रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत विरेश कुमार वय 45, रा. सैनिक स्कूल, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

esahas.com

सातार्‍यात चोरट्यांचा धुडगूस; लाखो रुपयांचा मुद्देमाल नेला चोरुन

सातारा शहरातील तांदुळ आळी, संगमनगर, पंताचा गोट व धनगरवाडी येथे चोरट्यांनी धुडगूस घातला. या चार ठिकाणी चोरट्यांनी जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

esahas.com

जिल्हा न्यायालयातही चोरट्याने साधला डाव; वकिलाच्या कोटासह 34 हजारांची चोरी

जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयातील महिला कक्षातून अज्ञात चोरट्याने महिला वकिलाचा कोट चोरला. या कोटामध्ये रोख 34 हजार रुपये, दोन पेन, चष्मा बॉक्स असा मुद्देमाल होता.

esahas.com

पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी परिसरातून लोखंडी पत्रे, पाईप, गज असा 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला.

esahas.com

वडोली-निळेश्वरमध्ये चोरट्यांकडून सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास

वडोली-निळेश्वर ता. कराड येथे चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचे दागिने लंपास केले. मंगळवारी ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना  घडली. दरम्यान, ग्रामस्थांना चोरट्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा पाठलागही केला. परंतु,  अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. यामध्ये प्रितमकुमार शामराव पवार यांच्या घरातून  २ लाख २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे

esahas.com

सातारा शहर परिसरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच

चोरट्यांनी याचीच संधी साधत अपार्टमेंटमधील तक्रारदार यांचा व प्रज्ञा भगवानराव सपाटे यांच्या घरी चोरी केली. ही घटना दि. 2 रोजी समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. तक्रारदार यांनी घरामध्ये पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले होते.

esahas.com

महिला महाविद्यालयातील रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

कराड : येथील महिला महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाचे ग्रिल कापून चोरट्यांनी सुमारे 9 हजार 710 रुपये चोरून नेले. महाविद्यालयातील चोरी व तोडफोडीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राचार्या डॉ. स्नेहल राजेंद्र प्रभुणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद क...