race

esahas.com

विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा

विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

ऐतिहासिक मंगळवार तळ्याला लाभले कारंजाचे सौंदर्य

सातारा शहराच्या पश्चिम भागामध्ये पर्यटकांसाठी पर्वणी ठरू शकणाऱ्या मंगळवार तळ्याने पुन्हा कात टाकली आहे. नगरसेवक वसंत लेवे यांनी स्वखर्चाने मंगळवार तळे जाळीबंद करून येथील जलस्त्रोताच्या शुद्धीकरणाची व्यवस्था केली होती.

esahas.com

जिलेटिन कांड्यांचे मूळ शोधण्याचे कराड पोलिसांसमोर आव्हान

कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्यांद्वारे उडवून देऊन 9 लाखांची रोख रक्कम चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सिनेमाप्रमाणे नामी शक्कल लढवली होती. कराड पोलिसांच्या दामिनी पथकाने वेळीच त्यांचा हा कट उधळून लावला.

esahas.com

बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी रूपये पन्नास हजार इतक्या प्रतिभूती ठेवीसह अर्ज शर्यतीच्या 15 दिवस आधी करावा : उपविभागीय अधिकारी रिचर्ड यानथन

सातारा : कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय यांच्याकडील अधिसूचनेनुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी बैलगाडी शर्यत आयोजित करण्याच्या किमान 15 दिवस आधी अनुसूची अ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नमुन्यामध्ये तसेच प्रत्येक बैलगाडी शर्यतीकरीता बॅक हमीच्या स्वरूपात किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरूपात रूपये पन्नास हजार इतक्या प्...

esahas.com

'काशीनाथाचं चांगभलं' च्या गजरात मोठ्या उत्साहात बावधनच्या भैरवनाथाची बगाड यात्रा साजरी

'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.

esahas.com

गोसाव्याचीवाडी येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन; चौघांवर गुन्हे दाखल

गोसाव्याचीवाडी, ता. खटाव येथे विनापरवाना श्वान शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी तेथीलच चौघांवर औंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात शिंदे कुटुंबियांचे योगदान

शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले. परंतु, शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सैदापूर येथील धनाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले आहेत. न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या लढ्यात शिंदे कुटुंबियांचे महत्वाचे योगदान असल्याचे गौरोवोद्गार माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी काढले.

esahas.com

तत्कालीन फडणवीस सरकारमुळेच बैलगाडा शर्यतींचा खटला भक्कम : विक्रम पावसकर

महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत तत्कालीन फडवीस सरकारने एप्रिल २०१७ मध्ये विधानसभेत कायदा मंजुर केला. तसेच, बैलांच्या धावण्याच्या क्षमतेचा अहवाल तयार करण्यासाठी समिती गठीत केली, तसेच तज्ज्ञ वकीलांचा खर्च राज्य सरकार उचलेल, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

esahas.com

बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्याच्या आनंदात कराडात जल्लोष

सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर या निर्णयाचा राज्यासह ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यातील सैदापूर- गोवारेसह अन्य ठिकाणी शेतकरी, मालक, बैलगाडी शर्यत शौकीनांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

esahas.com

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने पुसेगावमध्ये आनंदोत्सव

बैलगाडी शर्यत शौकीन व शेतकर्‍यांनी पुसेगावमधील चौका-चौकात हालगीच्या कडकडाटात, गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या धुमधडाक्यात जल्लोष साजरा केला. ठिकठिकाणी साखर-पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले.

esahas.com

राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग झाला मोकळा

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, ही बंदी आता उठवण्यात आली आहे. मात्र, या शर्यतींमध्ये पशू क्रूरती प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.

esahas.com

पुसेगावातील श्वान शर्यतीला उस्फुर्त प्रतिसाद

पुसेगाव, ता. खटाव येथे विकास जाधव व गौरव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्वान शर्यतीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाडी शर्यती बंद असल्याने या शर्यती पाहण्यासाठी शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.

esahas.com

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करणार

बैलगाडी शर्यतीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय आणि खिल्लार बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. सद्यस्थितीत राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संविधान आणि घटनेचा आदर करून तसेच कायद्याच्या चौकटीत राहून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

esahas.com

मुलीस त्रास देणाऱ्या रोडरोमिओची उंचलबांगडी

उंब्रजमध्ये शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या एका रोडरोमिओला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या रोडरोमिओची तक्रार मिळताच दोन तासात उंब्रज पोलिसांनी उचलबांगडी केली.

esahas.com

बैलगाडी शर्यत भरवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

कोरोना साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यानी कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम न करण्याचे व सार्वजनिकरित्या जमून खेळ न करण्याचे आदेश देऊनही निसराळे (ता.सातारा) येथे बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या सात जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.