फलटण ग्रामीण पोलिसांनी मलवडी खून प्रकरणातील आरोपी केवळ तीन तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
पतीचे असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमातून पोलिसी सेवेत असलेल्या पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी सराईत गुन्हेगारांना दिली. खुनाच्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला होता. शिवानंद जगन्नाथ पुजारी याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले.
जालना येथील वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील विकास गणेश मस्के याला सातारा येथे अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
ऋषीकेश आबा निकम याच्या खून प्रकरणी मोक्का खटल्यातील आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यास न्यायालयाने जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.
शिरवळ येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
एकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना मंगळवारी रात्री फरासवाडी ता. सातारा येथे उशिरा उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि तालुका पोलिसांनी 12 तासांच्या आत या खुनाची उकल केली आहे.
जळगाव ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिरवळ, ता. खंडाळा येथे बिबेवाडी, पुणे येथील एकाचा डोक्यात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी आज पुणे येथे अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिरवळ पोलिसांनी यापूर्वीच या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.
पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयित व मृत हे आतेभाउ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप खूनाचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.
संशयीत रवि कुडवे याचा दाजी नितीन नागेश भालशंकर (वय २१) रा. वैराग, सध्या रा. वाखाण परिसर, कराड हा त्याच्या पत्नीला व रविच्या बहिणीला दारु पिवून वारंवार मारहाण करत होता. त्याबाबत रवि त्याला समजावून सांगत असताना दोघांत वाद झाला. या वादात रविने गळा दाबून दाजी नितीनला बेशुध्द केले व त्यानंतर शेजारचा दगड उचलून त्याच्या छातीवर मारला.
चिमुकल्या ओमचा निर्घृणपणे खून करणाऱ्या क्रूर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.