वाल्मिक कराडच्या आरोपनिश्चितीवरून आज पुन्हा युक्तिवाद सुरू होण्याची शक्यता होती .मात्र विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे .
वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे
फलटण ग्रामीण पोलिसांनी मलवडी खून प्रकरणातील आरोपी केवळ तीन तासात जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
मेढा, ता. जावली येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या खुनाची उकल स्थानिक गुन्हे शाखेने केवळ बारा तासात केली आहे. याप्रकरणी दोघा जणांना जेरबंद करण्यात त्यांना यश आले आहे.
एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पतीचे असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमातून पोलिसी सेवेत असलेल्या पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी सराईत गुन्हेगारांना दिली. खुनाच्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
तीन वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित दऱ्या खटपट्या भोसले, रा.मालगाव, ता. सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने जांब, ता. वाई येथून अटक केली.
दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून जबरी चोरी करून त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिच्या खून प्रकरणातील संशयितास जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि तळबीड पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा पोलिसांनी केवळ दोन तासात उघड केला आहे.
महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या माजी उपसभापती वर खुनी हल्ला करणारे दोघेजण जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि सातारा तालुका पोलीस ठाणे यांना यश आले आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाईतील सिध्दनाथवाडीतील न्यास शिवाजी खरात हा १७ वर्षीय शाळकरी पोरगा कालपासून बेपत्ता होता, आज तो आढळला, पण असा की, डोक्याचेच तुकडे करून टाकल्याने ओळखही पुसून टाकण्याइतपत त्याची अवस्था करून टाकली आहे.
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दोन कंटेनर चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्याविषयी बोलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शिवानंद पुजारी याने स्वप्निल गीते यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. यामध्ये गीतेचा जागीच मृत्यू झाला होता. शिवानंद जगन्नाथ पुजारी याला शिरवळ पोलिसांनी बारा तासात जेरबंद केले.
येथील प्रतापगंज पेठेत कौतेय कॉम्प्लेक्स समोर रस्त्यावर एका मुलाच्या खुनाचा प्रयत्न करून गर्दी व मारामारी केल्याप्रकरणी बकासुर गँगच्या आठ ते दहा जणांच्या टोळीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जालना येथील वकील किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील विकास गणेश मस्के याला सातारा येथे अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कटगुण (ता. खटाव) येथील किशोर प्रल्हादराव विधाते यांच्या फार्महाऊसवर त्यांची आई श्रीमती सुमन प्रल्हादराव विधाते यांचा खून करणाऱ्या मध्यप्रदेशातील सुनीलकुमार गणपत गौड (वय ३०) याला वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस सक्त मजुरी तसेच दंडाची शिक्षा ठोठवली आहे.
जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने साडेतीन वर्ष कैद तसेच दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ऋषीकेश आबा निकम याच्या खून प्रकरणी मोक्का खटल्यातील आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यास न्यायालयाने जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.
माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापार्याचा कुर्हाडीने निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली. मात्र, म्हसवड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत हल्लेखोरास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी फलटण तालुक्यातील एकाचा खून केला. शशिकांत बाबासो कारंडे (वय ४७, मूळ रा. मठाचीवाडी, ता. फलटण, जि. सातारा, सध्या रा. एचडीएफसी बॅंकेमागे, भिगवण रोड बारामती) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे.
पाडेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी राहूल मोहीते याचा गळा चिरून अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. कसलाच पुरावा मागे न सोडता केलेल्या या खूनाच्या तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. लोणंद पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवत अखेर या खूनाचा उलगडा करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
विसापुर येथे झालेल्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या गुन्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी तपास पथकाला बक्षिसही जाहीर केले आहे.
शिरवळ येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शिरवळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तालुक्यातील विसापूर गावात एका 70 वर्षीय हनुमंत भाऊ निकम व कमल हनुमंत निकम वय 65 या पती-पत्नीचा खून झाला असल्याची भयंकर घटना घडल्याने खटाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. या दुहेरी हत्याकांडाची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
साताऱ्यात नटराज मंदिर परिसरात अज्ञाताचा गोळी घालून खून कोणाचे कारण अद्याप अस्पष्ट संशयिताचे घटनास्थळावरून पलायन सातारा दिनांक दोन प्रतिनिधी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी देव दर्शन करून येणाऱ्या दुसऱ्या इसमावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता भरदिवसा घडल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला आहे
येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कूपर कॉलनी येथे पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.ही घटना दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.
कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणार्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पहार मारून खून केला आहे. या घटनेने नागझरी सह परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव वय 35 असे मृत विवाहितेचे नाव आहे. बाबू बापू जाधव वय 42 असे संशयित आरोपीचे नाव आहे.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव (ता . फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असुन चौकशी सुरू केली आहे.
एकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना मंगळवारी रात्री फरासवाडी ता. सातारा येथे उशिरा उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि तालुका पोलिसांनी 12 तासांच्या आत या खुनाची उकल केली आहे.
ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
जळगाव ता. कोरेगाव येथील वैभव विकास ढाणे यांच्या खूनप्रकरणी गावातीलच पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पिस्तूलच्या सहाय्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याबरोबरच संशयितांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हे दाखल आहेत.
शिरवळ, ता. खंडाळा येथे बिबेवाडी, पुणे येथील एकाचा डोक्यात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी आज पुणे येथे अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिरवळ पोलिसांनी यापूर्वीच या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.
शिरवळ, ता. खंडाळा येथील निरा नदीकाठावरील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर संजय पाटोळे (रा. बिबवेवाडी, ता. पुणे) यांचा खून झाला असल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी समोर आली. गोळी झाडून हा खून झाला असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर शिरवळसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून खुनाचे नेमके कारण व मारेकरी कोण, याची माहिती घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
येथील रविवार पेठेत असणाऱ्या धायगुडे करिअर अकॅडमीच्या हॉस्टेल नजीक एका विद्यार्थ्याला मारहाण करून चुन्याच्या निवळीत टाकून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन पांडुरंग सोडमिसे, वय ४०, रा. रविवार पेठ सातारा त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील २४ वर्षीय विवाहितेचा छळ करुन तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला. असा आरोप माहेरच्या मंडळींनी केल्यानंतर सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासन व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
फलटण तालुक्यातील साठेफाटा येथे वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेप, पाच हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. शामसुंदर नारायण इंगळे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.
कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत महिलेचा झालेल्या खुनाचा गुन्हा चार तासात उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. शरद हणमंत ताटे, वय ३३, रा. येरावळे, ता. कराड असे अटक केलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. तर खुन झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळुंखे, वय ३०, रा. महिंद, ता. पाटण असे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत ऊसाच्या शेतात डोक्यात दगड घालून युवतीचा (वय अंदाजे २५ वर्षे) निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सोमवारी ३ रोजी सकाळी स्थानिक शेतकऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलीस पाटील व पोलीस पाटलांनी तात्काळ याबाबत कराड ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फलटण तालुक्यातील आसू येथील एकाला गंभीर दुखापत करुन त्याचा खून करणाऱ्या युवकास सहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. अमोल सुतार असे शिक्षा झालेल्याचे नाव असून या खटल्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या कोर्टात झाली.
रुवले (सुतारवाडी) ता. पाटण येथे एका नराधमाने सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह डोंगरातील ओढ्यात टाकून दिला. बुधवारी 29 रोजी दुपारच्या सुमारास घडलेली घटना गुरूवारी ३० रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 12 तासाच्या आत नराधम संशयित आरोपीला अटक केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील खुनाच्या प्रकरणातील सराईत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलीस आणि आरोपी गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांच्यात अर्धा तास चकमक सुरू होती. आरोपींसोबत झालेल्या झटापटीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अमृतकर यांनी दिली आहे.
पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. भारत कमलाकर जाधव, वय २७, रा. प्रतापगंज पेठ, सातारा असे त्याचे नाव आहे.
प्रशांत प्रकाश पवार (वय 23, रा. अनवडी ता. वाई) या युवकाचा अपघाती नव्हे तर त्याचा मारहाणीत खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा जि. सातारा येथील यादव भावकी असून मृत युवक नात्याने त्यांचा पाहुणा लागतो. पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली असून त्यातील दोघेजण माजी सैनिक आहेत.
मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोकसल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
म्हसवे, ता. सातारा येथील एका घरात अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना घडली. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासात केली असून या गुन्ह्यातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.
खिंडवाडी येथे १७ नोव्हेंबर तारखेला झालेला अमोल डोंगरे ह्या तरुणाचा खून हा नरबळी असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. त्या आधारे पोलिसांनी ह्या घटने मध्ये नरबळीच्या शक्यतेचा कसून तपास करावा आणि पिडीत कुटुंबाला न्याय द्यावा, असे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला डॉ हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, हौसेराव धुमाळ, वंदना माने, शंकर कणसे यांनी म.अंनिस मार्फत दिले आहे.
सातारा जिल्ह्यातील सालपे ता. फलटण येथील एसटी थांब्याजवळ किरकोळ कारणावरुन एकाचा लाकडी दांडक्याने दोघा भावांनी बेदम मारहाण करुन शेतमजूराचा खून केल्याने लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करीत खून करणारे संशयित दोघे भाऊ घटनास्थळावरुन फरार झाले असून शोधकार्यासाठी लोणंद पोलीसांचे विविध ठिकाणी पथके रवाना झाली आहे.
लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत सालपे गावाच्या हद्दीमधील एस.टी.बसथांब्याजवळ बापू निकम हे काही कामानिमित्त थांबले होते. दरम्यान, त्याठिकाणी किरकोळ कारणावरुन बापू निकम यांचे व सौरभ संजय जगताप, गौरव संजय जगताप (दोघे रा. सालपे ता.फलटण) या भावांबरोबर वादावादी झाली.
वाई तालुक्यातील आसले येथील एकाने भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुदत्त वाघ (वय ४२) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून त्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात सुरु होती.
पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजीक खिंडवाडी येथे झालेल्या खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून संशयित व मृत हे आतेभाउ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अद्याप खूनाचे नेमके कारण काय? हे गुलदस्त्यात असून पोलिस संशयितांकडे कसून चौकशी करत आहेत.
पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी नजीक असलेल्या दगडाच्या खाणीत चार दिवसांपूर्वी पाण्यावर तरंगत सापडलेल्या 28 वर्षीय युवकाचा मृतदेह अमोल डोंगरे (मूळ रा. बीड जिल्हा) यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडात माफीची साक्षीदार झालेल्या ज्योती मांढरेने गुरुवार दि.१८ रोजी सातारा जिल्हा न्यायालयात महत्वाची साक्ष दिली आहे. संतोष पोळनेच माझ्यासमोर तीन खून केल्याची साक्ष ज्योती मांढरेने दिली असून आपले पोळ याच्यासोबत मंदिरात लग्न झाल्याचंही ज्योती मांढरेने सांगितले आहे.
हॉटेल चालकाशी हुज्जत घालत असताना त्यामध्ये पडलेल्या ग्राहकावर दोघांनी फरशी डोक्यात घालून खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.
शेतातील ज्वारीच्या पिकाला पाणी द्यायला मनाई केल्याचा राग मनात धरून वरकुटे-मलवडी, ता.माण येथील वाघमोडे वस्तीवर राहणाऱ्या आण्णा धुळा वाघमोडे वय ७५ वर्षे यांचा त्यांचे सख्खे भाऊ मारूती धुळा वाघमोडे व आबा मारुती वाघमोडे यांनी शेतातच रात्री काठी व धारदार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना वरकुटे-मलवडीत घडली आहे.
सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे शुक्रवारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. बापाला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने आपल्या एका मित्राच्या मदतीने चार जणांना बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी लाथा बुक्क्या, काठी, ऊस अशा मिळेल त्या वस्तूने मारहाण करत चार युवकांना अक्षरश: रक्तबंबाळ केलं आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एकाचं उपचारादरम्यान निधन झालं आहे.
संशयीत रवि कुडवे याचा दाजी नितीन नागेश भालशंकर (वय २१) रा. वैराग, सध्या रा. वाखाण परिसर, कराड हा त्याच्या पत्नीला व रविच्या बहिणीला दारु पिवून वारंवार मारहाण करत होता. त्याबाबत रवि त्याला समजावून सांगत असताना दोघांत वाद झाला. या वादात रविने गळा दाबून दाजी नितीनला बेशुध्द केले व त्यानंतर शेजारचा दगड उचलून त्याच्या छातीवर मारला.
येथील बुधवार पेठेतील विजय विनोद कांबळे (वय 26) या युवकाच्या डोक्यात कोयता मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कराड शहरातील वाखान परिसरात 32 वर्षे महीलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उज्वला ठाणेकर (वय-32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते....
पहिली बायको असताना दुसरे लग्न का केले यातून झालेल्या वादातून पिंप्रद (ता. फलटण) येथे वडिलांनी मुलाचा कुर्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.
बहिणीस त्रास देत असल्याच्या कारणावरून सातार्यानजिक खंडोबाचा माळ येथे आकाश राजेंद्र शिवदास या युवकाचा निर्घृण खून करून मृतदेहाची पेटवून विल्हेवाट लावण्याची घटना घडली.
सातारा : आसले, ता. वाई येथील ओंकार चव्हाण यांचा निर्घृण खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याप्रकरणातील सुत्रधार गुंड अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव घटनेपासून पोलिसंना गुंगारा देत होता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाब राज्यातील भटिंडा शहरातील एका हॉटेलमध्ये बंटी जाधव व त्याचा साथीदार नखील शिवाजी मोरे वय 24 वर्षे रा. फुलेनगर भुईंज ता. वाई यांच्या मुसक्या आवळल्या. ...
शेतीच्या व शेतातील विहिरीच्या पाण्याच्या किरकोळ वादाच्या कारणातून व वडिलांना शिवीगाळ व मारहाणीच्या कारणातून गुरुवारी सायंकाळी आरोपी संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने यांनी मयत भाऊसो पांडुरंग माने यांना काठीने मारहाण केली. त्या मारहाणीत जखमी झालेल्या भाऊसो पांडुरंग माने यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊ संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने (रा. म्हासुर्णे, ता. खटाव) यांच्यावर संशय असून, त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातार्यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
कराड ः बाराडबरे परिसरात खुन्नसने बघण्याच्या कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन आहेत. तिघांकडे चौकशी सुरू आहे. आदित्य गौतम बनसोडे रा. बाराडबरे परिसर कराड या युवकाचा सोमवारी खून झाला होता. आदित्यची त्याच परिसरातील काही युवकांशी खुन्नस होती. याची परिणीती सोमवारी खुनाच्या घटनेत झाल्याचे तपासात स...
चिमुकल्या ओमचा निर्घृणपणे खून करणाऱ्या क्रूर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
कोरेगाव तालुक्यातील दरे गावच्या हद्दीत माळरानावरील पारधी वस्तीवर विजय सावता काळे यांचा नऊ जणांनी निर्घुण खुन केला होता. यापैकी दोन संशयीतांना कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले परंतु, मुख्य सुत्रधारासह इतर संशयीत पसार झाले होते. दि. 20 रोजी आसगाव, ता. सातारा येथील टेकडीवर एलसीबीच्या पथकाने मुख्य संशयीताचा थरारक पाठलाग करून त्यास जेरबंद केले.