राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त
हवामान अपडेट : राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार आहे . पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .
Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं
राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या परिमंडळांमध्ये केवळ कर्जांचे पुनर्गठन न करता शेतकऱ्यांना कर्जमाफीसह त्यांच्या शेती कर्ज वसुलीस स्थगिती देण्याची मागणी किसान सभेच्या वतीने सरकारकडे करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांनी शनिवारी तापोळा आणि दरे या दरम्यान नव्याने तयार होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली
मुंबईत अनेक नवे उद्योग, कंपन्या उदयास आल्या. याच श्रुंखलेत आणखी एका महत्वाच्या घटनेमुळे मुंबईच्या लौकिकात आणखी एक भर पडली. 20 मार्च 1830 रोजी मुंबईचे प्रवेशद्वार जगासाठी खुले झाले.
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे. आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे. तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.
१९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ''अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट'' तर्फे गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म "अल्ट्रा झकास" लॉंच करण्यात आले आहे.
जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या जैन समाजाच्या सर्वोच्च संस्थांचे संस्थापक व प्रेरणास्थान नयपद्मसागर महाराजसाहेब यांना जैन धर्मातील सर्वोच्च मानले जाणारे आचार्यपद प्रदान करण्याचा दिमाखदार सोहळा मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर हजारो जैन बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल.
करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. स्वबळ आणि ज्ञान यांच्या मदतीने मिळणार्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. कारण लवकरच येतंय कोण होणार करोडपती चं पुढचं पर्व. धनलक्ष्मी, प्रतिष्ठा आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याची हीच वेळ आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील पोस्ट ऑफीस उघडं आहे. ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहे. पारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर आल्याने धम्माल उडाली आहे.
मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे सातारा जिल्ह्याचा सुपुत्र ऑलिंपिक पदकवीर खाशाबा जाधव.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी आज येथे केले.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.
राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती.
सातारा शहर परिसरातील नटराज मंदिर येथे वाई येथील अर्जुन यादव या इसमाचा काही दिवसापूर्वी गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांना हवे असलेले मूळ सूत्रधार व रेकॉर्डवरील आरोपी अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे रा. गंगापूरी वाई व सोमनाथ बंडू शिंदे रा. रविवार पेठ, वाई यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नगर विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे 17 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघे आऊट ऑफ कव्हरेज गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला आहे. दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत.
अवैध पद्धतीने कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, कर्जदारांच्या तक्रारींची दखल घ्यावी, असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.
सैनिकांचा जिल्हा आणि सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मुंबईत आज पहाटे निधन झाले. वडिलांच्या नंतर देशसेवेत असलेल्या सुधीर निकम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.
प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती.
महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले गुढी पाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.
महाराष्ट्रासाठी आताची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकमताने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय झाला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले गुढी पाडव्याच्या मिरवणूका जोरात काढा, रमजान उत्साहात साजरा करा, बाबासाहेबांच्या मिरवणूका जोरात काढा.
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज (दि.१७) सातारा येथे पत्रकार परिषद झाली. यामध्ये बोलत असताना त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. राज्यातील उत्तम असणाऱ्या चार ते पाच बँकांपैकी असलेल्या मुंबई बँकेला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेपुढे तुमचे खरे चित्र आणतो आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
महिला सुरक्षेचा आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. साताऱ्यात या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.
चिनी ड्रायव्हर्स आता सुमारे 500,000 येन ($4,300) मध्ये लहान ईव्ही खरेदी करू शकतात. यूएस आणि चायनीज या दोन्ही बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थितीमुळे, होंडा ईव्हीकडे वळण्यासाठी इतर जपानी कार निर्मात्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे.
भारतरत्न लता मंगेशकर या पंचतत्वात विलीन झाल्या. लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले.
पुणे- बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅन न झाल्याच्या कारणावरून मुंबईतील नालासोपारा येथील वाहनचालकास कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित चालकाने भुईंज पोलिस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत सुरू झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भाजपकडून एक दक्षता समिती जाहीर करण्यात आली आहे. त्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (दि. १८ जानेवारी) याबाबतची माहिती दिली.
राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत. याबाबतचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत हा निर्णय झालाय.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसह विलीनीकरणाच्या लढ्यात हुतात्मा झालेल्या 65 कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यासाठी येथील प्रीतिसंगमवरून मुंबईतील आझाद मैदानापर्यंत कराड आगारातील एसटी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. त्यानुसार गुरुवारी 6 रोजी सकाळी 11 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापासून या पदयात्रेचे मुंबईकडे प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रा प्रतिनिधी पी. एस. सकपाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत वर्षभर अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
राज्यातील वाढत्या ओमायक्रॉन प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आजपासून लागू राहतील.
'सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, निर्णय प्रक्रियेत जनतेचा सहभाग वाढावा, यासाठी मुंबईसह सर्व महानगरपालिकांच्या प्रभागांमध्ये क्षेत्रसभा व्हाव्यात, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे.
कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. आयोग या निवडणुका पुढे ढकलणार का? याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, आता निवडणूक आयोगानं देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतकंच नव्हे, तर आयोगानं आरक्षणाशिवाय संबंधित २७ टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारीत तारीख देखील जाहीर केली आहे.
स्पर्धेवर यावर्षी परदेशी धावपट्टू नसल्याने स्थानिक धावपट्टूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत खुल्या माणच्या बाळू पुकळे या धावपटूने 1 तास 14 मिनिटे आणि 13 सेकंद इतक्या सर्वांत कमी विक्रमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. अनिल कोरवी याने 1 तास 19 मिनिटे 8 सेकंद दुसरा तर धर्मेंदर कुमार याने 1 तास 21 मिनिटे 13 सेकंद तिसरा क्रमांक पटकावला. तर भारतीय महिला गटात मुंबर्इच्या मनिषा जोशी यांनी 1 तास 46 मिनिटे 35 सेकंद या वेळेत पहिला क्रमांक पटकावला.
शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या मुंबईच्या चोरट्यास पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून कराडसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
लॉस एंजलिस येथे नुकत्याच पार पडलेल्या मिसेस एशिया यूएसएमध्ये मुंबईच्या राधिका राणे-भोसले हिने बाजी मारत ‘मिसेस एशिया यूएसए फर्स्ट रनरअप’ पुरस्कार पटकावला आहे. याबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी.
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन स्ट्रेन आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांच्या काटेकोर तपासणीचे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच महाराष्ट्र सरकारनेही आज मोठे पाऊल उचलत कोविड नियम अधिक कडक केले आहेत. राज्य सरकारने आज प्रवास व अन्य बाबींसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता दि. 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.
मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टो २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार) इतका सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले, तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी महाराष्ट्राकडून झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष मोलाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. ही शाबासकीची थाप असून त्यामुळे मला मातृभूमीची सेवा करण्यासाठी अधिक चैतन्य मिळेल, असे प्रतिपादन अल अदिल समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी केले.
मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळाने हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याने आता एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेची आवेदनपत्रे गुरूवार दि. 18 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत.
20 वर्ल्ड कप संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केले आहे.
भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे, त्यावरून कंगणाने इंस्टाग्राम पोस्ट करत टीकाकरांच्या वर निशाणा साधला आहे.
विश्वचषकानंतर विराट कोहलीने आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आला आहे. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.
मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले.याच पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे.
शहरातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर रविवारी ७ रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर पुण्या-मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची त्यामुळे चांगलीच दैना उडाल्याचे चित्र दिसून आले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार मंजूर 203 पैकी 112 घरकुलांसाठी केंद्र शासनाकडून 55.20 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. मात्र, उर्वरित 249.30 लाख रुपयांचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण राहिली आहे.
युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता,
'लार्जर दॅन लाइफ' सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर 'बाहुबली'च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. 'बाहुबली : द बिगनिंग' हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला 'बाहुबली : द कन्क्लुजन' या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
'शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर का जावं लागलं?' असा सवाल करतानाच 'उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ बऱ्याच काळानंतर धडाडली. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून ठाकरी शैलीत त्यांनी जुना मित्रपक्ष भाजप आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. जवळपास तासभर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. यात हिंदुत्व, ड्रग्ज प्रकरण, लखीमपूर खेरी हिंसाचार या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड त्याला पाठिंबा देत आहे. तर अनेक राजकारणी देखील आर्यन खानच्या बचावात समोर आले आहेत. अलिकडेच अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘बिग बी’ अमिताभ बच्चन वयाच्या ७९ व्या वर्षीही अफलातून अभिनय करताना दिसत आहेत. एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन सध्या कोट्यवधी रूपयांचे मानधन घेतात. मात्र, त्यांनी पहिल्या चित्रपटसाठी किती मानधन घेतले होते तुम्हाला माहित आहे का?
मुंबई : राज्यात महापालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच नगर पंचायतींमध्ये एक तर नगर परिषद, नगर पालिकांमध्ये दोन सदस्यांचे प्रभाग असतील. महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन सदस्यांची रचना असावी, असा आग्...
वाठार बुद्रुक येथे मंगेश पोमण याचा खून करून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता. या खुनात वापरलेली गावठी बनावटीची दोन पिस्टल तसेच एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल लोणंद पोलिसांनी जप्त केली आहेत.
पाचगणी, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अपुर्या रक्त साठ्याची समस्या निर्माण झाली आहे.नागरिकांचे आरोग्य व सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून अनेक ठिकाणी स्वयंस्फूर्तीने रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत.हीच बाब लक्षात घेऊन उदात्त भावनेने ग्रामस्थ मंडळ आंब्रळ, राजेंद्र शेठ राजपुरे युवा मंच आंब्रळ आणि ‘अक्षय ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आ...
पिंपोडे बुद्रुक, ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. महसूल व पोलिस प्रशासनाच्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने येणार्या जाणार्या लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.सविस्तर माहिती अशी, उत्तर कोरेगावातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे वाठार स्टेशन असून या ठिकाणी बँका प...
अभिनेत्री मोनालीसा बागल ही आत्तापर्यंत अनेक मराठी सिनेमा, मालिकेतून, वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. गेल्या वर्षी तिचा झी टॉकीजचा ’गस्त’ हा सिनेमा प्रदर्शित झालाआपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात आपले स्वतःचे नाव, अस्तित्व निर्माण केल्यावर अनेकांची इच्छा असते की आपलं स्वतःचं, आपल्या कष्टातून उभं राहिलेलं आणि आपल्या हक्काचं असं घर असावं. अनेकांनी घराचं स्वप्न स्...
सातारा, : सातारा हा विविध पुरातन वास्तूंनी नटलेला आहे. अजिंक्यतारा, बारा मोटेची विहीर, पाटेश्वरचे मंदिर, औंधचे मंदिर, क्षेत्र माहुली येथील मंदिरे, पाटण येथील तलवार विहीर या सारख्या अनेक पुरातन वास्तू सातारा तालुका आणि जिल्ह्यामध्ये आहेत. यामध्येच अजून एक म्हणजे परळी येथील मंदिर, परळी गावाच्या बाहेर हे मंदिर आहे. मंदिराजवळील पटांगणात संध्याकाळी तुम्हाला मुले क्रिकेट किंवा इ...
वडूज : येथील प्रा. अजय वसंतराव शेटे यांची पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी पदी निवड झाली आहे.राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर साहेब यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामंत्री भगवानराव बागल, अनिल कचरे यांनी शेटे यांना नियुक्तीचे पत्र दिले. पंतप्रधान जनकल्याण योजनांचा लाभ संपूर्ण म...
वडूज : वंजारी सेवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुधाकर मुंढें यांची निवड झाली आहे. संघटनेच्या संघटक पदावर असताना मुंढे यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सेवा संघाचे अतिशय चांगल्या प्रकारे बांधणी करुन संघ मजबूत करुन स्व. मुंढेसाहेबांचे कार्य तळागाळातील समाज बांधवासाठी काम केले. त्यांच्या कार्याची कार्यकारणीने दखल घेवुन त्यांची राज्य उपाध्यक्ष पदी बढती देण्यात आली आहे....
शंभू महादेवाचे मंदिर बंद असल्यामुळे या परिसरातील लोकांना प्रचंड अडचण निर्माण झालेली होती. जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची भावना असणारे येथील लोकांना अडचणीच्या काळात सामाजिक व दानशूर लोकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट आणून देणारे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवून साजरा करण्यात आला. मंदिर परिसरातील पुजारी व गरजू कुटुंबांना त्यांनी 700 किलो ज्वारी वाटून वाढदिवस साजरा केला.
राजेंद्र चोरगे यांच्या मातोश्री कै.कृष्णाबाई मधुकरराव चोरगे यांच्या स्मरणार्थ श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आज हॉकर्स संघटनेचे 100 सभासद यांना कर्तव्य भावनेतून धान्याचे किटचे वाटप करण्यात आले.
मेगन मार्कल आणि प्रिंस हॅरी हे ओप्रा विन्फ्रें यांच्याशी झालेल्या इंटरव्ह्यू नंतर फारच चर्चेत आले होते. शाही परिवारातील अनेक गोष्टी त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या होत्या. पेज सिक्सच्या वृत्तानुसार शाही परिवाराकडून रॉयल्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण यात प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांना खालचं स्थान देण्यात आलं आहे. युके डेली एक्सप्रेसच्या वृत्तानुसार , 9 शाही परिवा...
कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो. कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमीन आणि मिनरल असतात. त्यामुळे डाळींचा आपण आपल्या आहारात समावेश करतो.कोणतीही डाळ आरोग्यासाठी चांगलीच असते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व...
उन्हाळ्यात लहान मुलांच्या शरीरावर बहुतेकदा पुरळ येतं. हवामानातला बदल, अशक्तपणा, रोग प्रतिकारशक्ती कमी असणं, आयर्नची कमतरता आणि त्वचेवर केमिकल बेस्ड प्रोडक्ट्सचा जास्त वापर अशा अनेक कारणांनी पुरळ येतं. पुरळामुळे मुलांना वेदना होतात, जळजळ होणं, ताप येणं, सूज यासारख्या समस्याही होऊ शकतात. बर्याच वेळा यावर घरगुती उपचार केले जातात. पण, जास्त दिवस पुरळ राहिलं तर, त्याकडे दुर्लक्...
निढळ ः खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी सोयाबीनमधील उच्चतंत्रज्ञानाचा अवलंब करणे, ही काळाची गरज आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ होते, असा विश्वास कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी व्यक्त केले.निढळ, ता. खटाव येथे ‘हिंदमाता फार्मस प्रोड्यूसर कंपनी’चे सदस्य व शेतकर्यांना सोयाबीन केडीएस 726 बियाणे वाटप करुन ...
पिंपोडे बुद्रुक, दि. 7 (वार्ताहर) ः जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमी डॉ.प्रा. नितीन मोहिरे यांच्या संकल्पनेतून आज वाठार पोलीस स्टेशन परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांच्याहस्ते ’बेलाचे’ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. सामाजिक जाणिवेतून डॉ. नितीन मोहिरे यांनी 2007 मध्ये गेली पंधरा वर...
वडूज, : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर वडूज परिसरातील सर्व व्यवसाय ठप्प आहेत. अशा परस्थितीत दररोज मोलमजूरी करुन जीवन जगणार्या अनेक कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह अडचणीत आला आहे. अशा शेकडो कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करुन येथील जय मल्हार करीअर अॅकॅडमीच्या वतीने आधार देण्यात आला.अॅकॅडमीचे संस्थापक बनाजी पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च ट...
महाबळेश्वर, ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त येथील मुख्य छ. शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र व राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यासह आ. मकरंदआबा पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. य...
लोणंद, ः जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून लोणंद येथील कोविड केअर सेंटर असलेल्या शरदचंद्र पवार महाविद्यालयाच्या परिसरात प्रांताधिकारी संगीता राजापुरे चौगुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिवस दिवसाचे औचित्य साधून वसुंधरेचे संवर्धन होण्यासाठी पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असते. लोणंद येथेही जागतिक प...
महाबळेश्वर, ः केंद्र शासनाकडून लसींचा पुरेसा पुरवठा उपलब्ध होत नाही अशा वेळी लसीकरणासाठी शासनावर अवलंबून न राहता राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी लस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्वर पांचगणी पालिकांनी जर पुढाकार घेतला तर काही प्रमाणात नगरविकास विभागाच्या वतीने पालिकांना आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना एकनाथ शि...
वरकुटे, ः करोनावरील उपचार पद्धतीबद्दल सतत नवनवीन माहिती उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत अनेकदा औषधांचा अतिरिक्त वापर होण्याचा धोका संभवतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी मार्गदर्शक प्रणालीप्रमाणेच आणि आचारसंहितेचे पालन करावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केली आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची भयग्रस्तता, नातेवाईक...
सातारा, ः जागतिक पर्यावरण दिनाला संस्थापक रुप देणार्या संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण संरक्षणासाठी दहा वर्षाची निर्णायक लढाईची घोषणा करून प्रयत्नांची सार्थकता वाढवली आहे, ही सार्थकता वाढवयची असेल आणि पर्यावरण टिकवायचे असेल तर ‘झाडे लावा’ हा उपक्रम अग्रहक्काने राबवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिन व काँ...
वरकुटे-मलवडी, ः कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहेत. कोरोनाच्या प्रकोपामुळे रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसणे आणि त्यामुळे होणारे रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी वरकुटे-मलवडी येथ...
औंध, ः खटाव तालुक्यातील औंध येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या कोवीड सेंटर सुरू आहे. या सेंटरला वीजपुरवठा कमी पडत होता. तो वाढविण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्यांनी अहोरात्र परिश्रम घेवून कोरोना महामारीत तत्परता दाखविली. याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबतची अधिक माहिती अशी, औंध ग्रामीण रुग्णालयात 100 सिलेंडर प्रतिदि...
महाबळेश्वर ः हिलदारीच्या मदतीने देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर हिलस्टेशन म्हणून महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ नावारूपास येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला. दरम्यान, शहरातील विविध सेवाभावी संस्था संघटना व नागरिकांनी या प्रकल्पास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिलदारी व गिरिस्थान नगर परिषद यांच्या संयुक्...
कुडाळ : जात्यावर दळण दळीते सुपात गोंधळ घालीत अशी पारंपारिक जात्यावरील गीत आता सध्या 21व्या शतकात लुप्त होऊ लागली आहेत. जात्याची घरघर आता कुठे ऐकू येत नाही इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात देखील, जा त्याची घरघर पूर्णतः बंद झाली आहे. मात्र, महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न जावळी तालुक्यातील प्राथमिक शिक्षिका योगिता मापारी, अंजली गोडसे, प्रियांका किरवे, शिल्पा फरांदे यांनी जात्यावरील ओव्यांच्या माध्यमातून कोरोना जनजागृती पर अनोखे प्रबोधनपर गीत तयार केले असून या जात्यावरील ओव्यांच्या व
’होणार सून मी या घरची’ मालिकेतून जान्हवीच्या रुपात अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहचली आहे. या मालिकेपासूनचं तिची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. नुकताच तेजश्री ’अग्गबाई सासूबाई’ मध्ये झळकली होती. यामधील तिची शुभ्राची भूमिका देखील खुपचं लोकप्रिय ठरली आहे. यामधील तिची शुभ्राची भूमिका देखील खुपचं लोकप्रिय ठरली आहे. नुकताच तेजश्रीने महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिलेच...
केसांना कलर करणे हा ट्रेंड वाढतोय. पांढरे केस लपवण्यासाठी ब्लॅक कलर सर्रास वापरला जातो. मात्र आजची तरुणाई ब्लॅक केसांना व्हाइट बनवताना दिसतायत.रेड, येलो असे हेअर कलर सध्या ट्रेन्ड आहेत. आता कलर करताना तात्पुरता की कायमचा कलर करायचा हे ठरवा. तसेच केसांना कलर केल्यानंतर काळजीही घ्यावी लागते.कलर करताना चांगल्या दर्जाचे कलर वापरा. त्यानंतर त्याचा योग्य तो परिणाम दिसून येईल. हेअर ...