साताऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत बिचुकले यांनी नामनिर्देशन पत्र भरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
सवड येथील शिंपी समाजाचे वतीने सातारा नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांचे मार्गदर्शनाखाली संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ६७३ वी संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडली या वेळी पहाटे काकड आरती अभिषेक आदी झाले वर झांज पथक ढोल ताशा यांचे गजरात विठ्ठल रखुमाई निवॄती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई नामदेव महाराज यांचें जिवंत व्यक्ती रेखा यांचें उपस्थि...
मला सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी येवून भेटतात आणि योजना मागतात. प्रत्येकाला पाणी योजनेची वर्कऑर्डर दिली आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
विरोधक या योजनेचे श्रेय घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करत असून योजनेसाठी त्यांनी काय परिश्रम घेतले ते स्पष्ट करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.
आरळे, ता. सातारा येथून अज्ञात इसमाने २ लाख ५ हजार रुपये किमतीची बोलेरो जीप चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
संजीवनी महिला विकास संस्थे मार्फत यंदा प्रथमच नागपंचमी उत्सवाचे आयोजन असंख्य हितचिंतक व सभासदांच्या आग्रहास्तव करण्यात आले आहे. या उत्सवात स्पर्धा तसेच बक्षिसांची रेलचेल असणार आहे.
नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे. बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2,7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले.
पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत देशप्रेमाची प्रचिती देत पर्यावरणपूरक आदर्शवत रंगपंचमी साजरी करण्यात आली. ‘संजीवनी’च्या या उपक्रमाचा आदर्श शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे परिसरातून बोलले जात आहे.
सातारा उपनिबंधक आणि संजीवनी नागरी पतसंस्थेच्या साटेलोट्यामुळे एका कर्जदार भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा खटाव तहसिलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान महाबळेश्वरहुन वाईला येणारी जीप (एमएच ११ एके ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेलाही ठोकरले. नंतर ही जीप धोम उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली.
‘जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या ‘जल जीवन मिशन’मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा कोंडवे (सातारा) येथे पार पडली. या सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्षपदी संजीवन रामचंद्र जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होणार्या या अपव्ययाबद्दल सातारकर जनतेतून जीवन प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्याचा अडमूठेपणा करत आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधी आंदोलन करण्यात आले.