heartattack

esahas.com

वेळीच सावध व्हा, जास्त उशीर करू नका! हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसतात 'ही' लक्षणं, हृदयाचा इशारा समजून घ्या

हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधीच शरीरात दिसणारी हृदयविकाराची पूर्व लक्षणे ओळखा, जेणेकरून तुमचे किंवा इतरांचे प्राण वाचवणे सोपे होऊ शकते.

esahas.com

हार्ट अ‍टॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, सामान्य वाटली तरी दुर्लक्ष करू नका

जर तुम्हाला छातीत दुखण्यासह चक्कर येत असेल तर हे संकेत चांगले नाहीत. अशा वेळी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हार्ट अ‍टॅकपूर्वी हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होतो आणि मेंदुपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे काही वेळा चक्कर येणं, बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावेत.

esahas.com

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती.

esahas.com

शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फिरकीचा जादूगार आणि ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या फिरकीच्या तालावर दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या शेन वॉर्नने अखेर या जगाचा ५२व्या वर्षी निरोप घेतला.

esahas.com

हृदयविकाराने एसटी चालकाचा मृत्यू

हृदयविकाराने छातीत दुखत असल्याने एसटी चालक हणमंत राजाराम सुर्यवंशी वय ५१ रा. पिलेश्वरीनगर म्हसवेरोड करंजे तर्फे सातारा यांना प्राथमिक उपचार खासगी रुग्णालयात केल्यानंतर अधिक उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

esahas.com

डॉ. अतुल मुळे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

डॉ. अतुल मुळे यांचे आज दि. २७ फेब्रुवारी रोजी वयाच्या ४९ वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले.

esahas.com

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले.

esahas.com

पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

तब्बल अडीच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले पत्रकार मोहन मस्कर- पाटील (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला.

esahas.com

जिल्हा पोलीस दलातील जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

सातारा जिल्हा पोलीस दलातील निलेश गौतम बच्छाव (रा. बसापा पेठ, सातारा) या अवघ्या २९ वर्षीय पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. काल पीटी परेड झाल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागल्याने खासगी रुग्णालामध्ये दाखल करण्यात आले होते.