1956 सालच्या मे महिन्यातली गोष्टी. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचं एक पथक अफगाणिस्तानात अभ्यासासाठी गेलं होतं.
येथील महागणपती घाटावर परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी व शहरातील सहा मद्य विक्रीच्या दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याप्रकरणी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले. दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला विसर्जनासाठी यंदा पाणवठ्यांवर एकत्र येण्याऐवजी भागाभागांतच मूर्ती विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिली.
मूळचे कसबा पुणे येथील नकुलराव नितीनराव शितोळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुजा नकुलराव शितोळे या दाम्पत्याचा सिंगापूर येथे सुरू असलेला ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सिंगापूरवासियांना चांगलीच उर्जा देत आहे. हे दांपत्य गेली सलग आठ वर्ष आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना करत आपला मराठी बाणा जपत आहे.
विघ्नहर्ता बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत श्रींच्या समोर सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. कोरोना संकटातही भाविकांची उत्साहात खरेदी सुरू होती.
‘सर्व गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सामाजिक जाणिवेतून आदर्श निर्माण करत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाणार व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा,’ असे आवाहन वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी केले.
म्हासुर्णे, ता. खटाव येथे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सर्व सार्वजनिक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने राबवण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोनाचे संकट तालुक्यातही गडद होत आहे. गावोगावी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागल्यामुळे गणेशोत्सव काळात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून आधीच कोरोनाच्या लढाईत सर्व पातळीवर व्यस्त असणार्या प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत म्हासुर्णे गावाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.