farmer

esahas.com

पुण्यात बिबट्यांचा उच्छाद! शेतकऱ्यांमध्ये भीती, महिलांचे शेतात गळ्याला पट्टा बांधून काम

पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांच्या दहशतीनं जगणं कठीण झालं आहे. स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.

esahas.com

विकसित कृषी संकल्प अभियानाच्या सहाव्या दिवशी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुण्याजवळच्या नारायणगाव येथे शेतकऱ्यांशी साधला संवाद

बोगस खते किंवा कीटकनाशके बनवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल : शिवराज सिंह चौहान "कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार करावे मार्गदर्शन” “महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील असून त्यांनी स्वतः संशोधनातून शेतीचे आधुनिकीकरण केले सुनिश्चित”बोगस खते किंवा कीटकनाशके बनवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल : शिवराज सिंह चौहान "कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार करावे मार्गदर्शन” “महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील असून त्यांनी स्वतः संशोधनातून शेतीचे आधुनिकीकरण केले सुनिश्चित”

esahas.com

शेतकरी संघटनेचे ६ मार्च पासून कांद्याच्या माळा घालून आंदोलन

केंद्र शासनाच्या आयात निर्यातीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना ६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची माहिती शेतकरी संघटनेच्या शंकर गोडसे यांनी दिली आहे.

esahas.com

मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प

उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशा शब्दांत भाजपा चे सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

esahas.com

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर शेतकरी संघटनांचा बहिष्कार

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याला एकरकमी एफ आर पी अधिक दोनशे रुपये मिळावेत, ही विविध शेतकरी संघटनाची मागणी आहे. या संदर्भात बुधवारी नियोजन भवनामध्ये आयोजित बैठकीला जिल्हा प्रशासनाने म्हणावा तसा प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या विविध संघटनेच्या शेतकरी सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे एफ आर पी च्या संदर्भातील आयोजित बैठकीचा एकंदर फियास्को झाला.

esahas.com

फलटण - पंढरपूर महामार्गावरील विडणीमध्ये ट्रॅक्टर घुसला शेतकऱ्याच्या घरात

पंढरपूर महामार्गावरील फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीत अब्दागिरेवाडी येथे डांबरी रस्ता सोडून सुमारे चाळीस फूट आतमध्ये असलेल्या घरामध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, बावधन, खटाव, जावळी, कराड, पाटण या तालुक्यातील शेतकऱ्यांना हळद बियाणे विदर्भ ऍग्रो कंपनीने पुरवले व त्याचा निघालेला माल कच्चा व पक्का खरेदी करून शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या रकमांचे चेक दिले. या व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार शेतकरी संघटना व किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकराव गोडसे यांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे केली आहे.

esahas.com

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा

विविध मागण्यांसाठी पुणे बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले .

esahas.com

शेतकऱ्यांना किती मदत केली याचा उद्धव ठाकरे यांनी हिशोब द्यावा

मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्री चा उंबरठा ओलांडला नाही ते उध्दव ठाकरे आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याची नाटके करीत आहेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकट काळातील शेतकऱ्यांना किती मदत केली याचा हिशोब द्यावा अशी सणसणीत टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

esahas.com

वडूज येथे पिसाळलेल्या वानरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

esahas.com

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे होतील : खा. श्री. छ. उदयनराजे

आज आपण खुर्चीत बसतोय, पण उद्या वाडगे घेवून बसणार. तेव्हा अशी अवस्था तुमची, तुमच्या भावी पिढीची करायची आहे का ? असा सवाल भाजपचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

esahas.com

शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला कोण वाली आहे का नाही?

कोरोना काळात रसातळाला गेलेला शेतकरी कसाबसा सावरतोय , तो पर्यंतच आले पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर  खोडवा आल्याचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी  गडांतर आणले आहे.

esahas.com

जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा : राजू शेळके

जिल्ह्यातील सर्व आले उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली लूट तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी सातारा, कोरेगाव, खटाव येथील शेती उत्पन्न बाजार समितीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com

शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतीसाठी विद्युत पंप सुरू करत असताना शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी काशीळ, ता.सातारा येथे घडली. शरद बाजीराव जाधव (वय.५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

esahas.com

कष्टकरी व शेतकऱ्यांचे नेते साजिद मुल्ला यांचे निधन

बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला (वय 42) यांचे आज कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने शेतकरी चळवळीला एक मोठा धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

esahas.com

शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर

शेतकऱ्यांनी अद्यावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून गावातील शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर यांनी केले.

esahas.com

पावसाच्या दडीने शेतकऱ्यांच्या लागल्या आभाळाकडे नजरा !

पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरु होवून नऊ दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप बुध परिसरात दमदार पाऊस पडला नाही. पावसाअभावी पेरणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.

esahas.com

शेतकरी एकल महिलांसाठीचा विनामूल्य बियाणे वाटप कार्यक्रम माणुसकीवर विश्वास वाढविणारा

सातारा जिल्ह्यातील घेतलेल्या आढावा बैठकीत ठरल्यानुसार आज माणदेशी फाउंडेशनने या महिलांना विनामूल्य बियाणे देण्याचा घेतलेला कार्यक्रम हा या महिलांचा माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ करणार आहे, असे मत आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

esahas.com

शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.

esahas.com

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज पुरवठा करावा

शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करत असतो. तरीही त्याला पिकांना पाणी पाजण्यासाठी रात्री जायला सांगणे, हे  मानवी हक्काचे उल्लंघन आहे. रात्री अपरात्री जंगली श्वापदांच्या हल्ला होण्याची तसेच सर्पदंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेती पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.

esahas.com

रेठरे खुर्दमध्ये हार्वेस्टर मशीनखाली सापडून शेतकर्‍याचा मृत्यू

रेठरे खुर्द, ता. कराड येथे हार्वेस्टर मशीनच्या सहाय्याने ऊसतोड सुरु असताना मशीनखाली सापडून शेतकर्‍याचा मृत्यू झाला. गुरुवारी 3 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या कांड्या गोळा करताना ही घटना घडली. संभाजी शंकर पाटील (वय 45) रा. रेठरे खुर्द ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

esahas.com

शेतकऱ्यास धमकी देणाऱ्या कोळकीतील खासगी सावकारास अटक

निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे साडेतीन लाख घेऊनही सोळा लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

esahas.com

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधा-यांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाने 2 कोटी 33 लाख 37 हजारचा निधी सातारा विभागाकडे वर्ग केला आहे. हा निधी मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

esahas.com

शेतकरी सन्मान निधीचा दहावा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा दहावा हप्ता शनिवार १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या योजनेच्या १० कोटी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पावसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

esahas.com

शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल

शेतकऱ्यांनी पिकवलेला फळे, भाजीपाला हा काही कालमर्यादे पुरताच टिकून राहतो. काल मर्यादा संपल्यानंतर त्यांचा माल हा खराब होतो व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे. यामुळे शेतकऱ्यांना, देशाला लाभ होईल, असे प्रतिपादन जलशक्ती, अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले.

esahas.com

शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या मकाई कारखान्याच्या चेअरमनला अटक करा

करमाळा, जि. सोलापूर येथील ‌मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली आहे. याचा बळीराजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कारखान्याच्या चेअरमनला अटक करा. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

esahas.com

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार : प्रदीप विधाते

जनतेच्या प्रेमामुळे आणि पक्षाने टाकलेल्या विश्वासामुळे देशातील सहकारातील मोठी संस्था असलेल्या सातारा जिल्हा बँकेत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. बँकेने कायमच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी दिली.

esahas.com

केंद्र सरकारने शेतकऱ्यांबद्दलचे धोरण बदलावे

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

esahas.com

कालगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीवर बारा आठवड्यात निर्णय घ्या

कालगाव, ता. कराड येथील शेतकऱ्यांच्या १२ एकर जमीनीवर १९६८ साली भुसंपादन झाल्याचे आवार्ड दाखवत १ मार्च २०२० रोजी भुमी अधिक्षक कार्यलय व प्रांत कार्यलय यांनी परस्पर फेरफार करत ७/१२ वर रेल्वेचे नाव लावण्यात आल्याने त्याविरुद्ध बाधित शेतकरी योगेश जगन्नाथ चव्हाण व इतर शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

esahas.com

कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर देशातील शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता आपले आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत कृषी कायदे रद्ध झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला असल्याचे मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

esahas.com

स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

esahas.com

शेतकरी योग्य वेळी कारखानदारांना जागा दाखवतील : साजिद मुल्ला

कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी 2920 रुपये येत्या 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफआरपी या कायद्याची अंमलबजावणी का करत नाहीत.

esahas.com

शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर 25 एकरावरील द्राक्षबाग नष्ट

कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या औषधाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दुसरीकडे, कंपनीने नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्याने दोन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे.

esahas.com

शेतकऱ्यांना उच्चतम दर देण्यासाठी उपपदार्थ निर्मितीवर भर

गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वेळच्या वेळी देणारा कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. राज्यातच नव्हे तर देशात अजिंक्यतारा कारखान्याने एक आदर्श निर्माण केलेला आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून शेतकऱ्यांना आणखी चांगला ऊसदर देता यावा यासाठी उपपदार्थ निर्मीतीवर जास्त भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

esahas.com

खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी!

ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेचीव शेतकऱ्याची फसवणूक केल्या प्रकरणी सपशेल माफी मागावी

esahas.com

'अजिंक्यतारा' शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द

आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

esahas.com

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येचेे शेतकर्‍यांना निंबोळी अर्कविषयी मार्गदर्शन

भालवडी, ता. माण येथील शेतकर्‍यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अनुराधा शामराव बनसोडे हिने पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवायचे व निंबोळी अर्कचा वापर विविध पिकांवर कसा करावा, याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखवले

esahas.com

वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचा तीव्र आंदोलनाचा पवित्रा 

सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्‍या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी गावच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी जात असताना स्वातंत्र्य पूर्व काळापासून तहानलेली जनता कसलीही तमा न बाळगता, जनआंदोलन उभारून पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचे मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते धीरज जगताप यांनी शेनवडी येथे व्यक्त केले.

esahas.com

वाघोलीत कृषिकन्येकडून शेतकर्‍यांना विविध प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन

आजच्या युगात शेतकर्‍यांनी जागतिक उत्पन्न वाढीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शेतकर्‍यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे व कौशल्याचा सुनियोजित वापर व्हावा, ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून वाघोली, ता. कोरेगाव येथील कृषिकन्या ऋतुजा जायकर हिने शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन विविध प्रात्यक्षिके राबवली.

esahas.com

.. तर कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन

गाईच्या दूधाला दर देण्याच्या मागणीसह दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दि. 24 जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.