निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप सुप्रीम कोर्टात नोंदवण्यात आला आहे.
Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत.
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरचं आपलं मौन सोडलं आहे.
45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आ...
राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र असून भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. रा...
सातारा तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. निकाल हाती येताच विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 133 ग्रामपंचायत पैकी 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 18 ग्रामपंचायती अंशतः बिन विरोध झाल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक 64 ग्रामपंचायतीमध्ये लागली असून थेट सरपंचाच्या 57 पदासाठी 146 जन रिंगणात आहेत. 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
माण-खटाव विधानसभा मतदार संघात तेथील आमदार जयकुमार गोरे यांना माझे आवाहन राहणार असल्याचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष व प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, शासन शेतकर्यांना सक्षम करण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक आरक्षण द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितलेे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम २३ अन्वये प्रशांत तायडे यांनी दाखल केलेले अपील सहकार विभागाने मान्य केले तर ४७ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे. सहकार विभाग उच्च नायल्याच्या निकालाचा अवमान करून प्रस्थापितांच्या बाजूने निकाल देणार का? यावर जिल्हा वासियांकडून तर्कवितर्क नोंदवले जात आहेत
मेढ्यात शेतक-यांनी नेत्यांवर दाखविला विश्वास.
महिलांचे संघटन अधिक मजबूत करुन काँग्रेसची विचारधारा जिल्ह्यात आणखी गतीमान करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे.
व्यंकटपुरा पेठ व मोरे कॉलनी येथे विरोधकांनी टॅंकरने सुरू केलेले पाणीवाटप हे हेतूपूर्वक असून निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचे हे उद्योग सुरू झाले आहेत. महादरे तलावाकडे आणि त्याच्या वॉल्वकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करा, अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब दि. १९ जानेवारीपर्यंत सादर करावा, तो न केल्यास संबंधित उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अर्चना वाघमळे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 318 पैकी एकहाती 98 ग्रामपंचायती जिकल्या आणि भाजपा सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव विजयी सातारा : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची सन 2022 ते 2027 कालावधीसाठी झालेल्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव हे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून पहिल्या पसंतीची 1701 मते घेऊन मोठ्या फरकाने निवडून आले. या निवडणुकीसाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली होती. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 33 मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यांनतर दि.16 नोव्हेंबरं रोजी मतमोजणीप्रक्रिया घेण्यात आली. सदर निवडणूक ही पसंतिक्रम नोंदवून घेण्यात आले होते त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुमारे 36 तासाहून जास्त वेळ चालली. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात सुमारे 11131 पदवीधरांनी मतदान केले होते. या मतदारसंघातून 10 उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यापैकी 9 उमेदवार हे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष मा.डॉ. संजय डी पाटील यांचे अध्यक्षतेखालील विद्यापीठ विकास आघाडीचे निवडून आले. तर विरोधी आघाडीचा फक्त 1 उमेदवार निवडून आला. आजपर्यंत सिनेट अधिसभा निवडणुकीत नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व दिसून आले आहे परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघातून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून एकमेव तासवडे, ता.कराड गावचे सुपुत्र अमित जाधव यांना शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. इतर सर्व निवडून आलेले 9 उमेदवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सातारा, सांगली आणी कोल्हापूर असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षत्र असल्याने सदर निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालये या अंतर्गत येतात. विद्यार्थी, पदवीधर, प्राध्यापक, कर्मचारी आणी संस्थांचालक यांना भेडसवणारे प्रश्न, शैक्षणिक धोरण, विद्यापीठ अर्थसंकल्प , परीक्षा आदी महत्वपूर्ण बाबींवर अधिसभा सिनेट मध्ये निर्णय घेण्यात येतात. अमित जाधव हे गेल्या बारा वर्षांपासून कॉंग्रेसच्या विद्यार्थी ( छडणख ) व युवक संघटनेत काम करीत आहेत. सध्या ते सातारा जिल्हा युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. विद्यापीठांतर्गत येणार्या सर्व घटकांचा आवाज बनून मी नक्की अधिसभेत हक्काने प्रश्न उपस्थित करून त्यावर न्याय मिळवून देईन अशी प्रतिक्रिया अमित जाधव यांनी विजयी झालेवर दिली. तसेंच मला सदर ठिकाणी काम करणेची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.आ.पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री मा.आ.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब , विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष मा.डॉ.संजय डी पाटील साहेब , मा.आ.ऋतुराज पाटील, मा.आ.जयंत आसगावकर यांचे आभार मानले. या विजयाबद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाश बापू पाटील, डॉ.डी.आर मोरे सर, भैया माने, धैर्यशील बाबा पाटील, अमित कुलकर्णी, देवराज दादा पाटील, उदयसिंह पाटील, चित्रलेखा ताई कदम, अमरसिंह पाटणकर, निवास थोरात, सचिन बेडके - सूर्यवंशी, संजीव चव्हाण, पृथ्वीराज गोडसे, डॉ.सूर्यकांत केंगार, प्राचार्य एल. जी.जाधव , प्राचार्य मोहन राजमाने आदीनीं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कडून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना बडोदा व अहमदाबाद या विभागाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी पक्ष नेतृत्वाने सोपविली आहे.
सातारा जिल्ह्यातील श्रीमंत सहकारी बँक असा नावलौकिक प्राप्त केलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संचालक पदासाठी सव्वा चारशे अर्ज दाखल होण्याची वेळ आली. त्यामध्ये जातीच्या राजकारणाची लागण झाली असून या शिक्षकांना गुरू कोण? याचीच चर्चा रंगू लागली आहे.
भणंग ग्रामपंचायतीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक मच्छिंद्र क्षीरसागर यांच्या पाडळेश्वर पॅनेलला मतदारांनी नाकारले असून थेट सरपंच पद व अपक्षांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ घातली आहे. पॅनेलचा फक्त एक उमेदवार निवडून आला आहे.
कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात नुकताच झालेल्या खेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका मताला तीन हजार रुपयांचा भाव काढण्यात आला होता, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा, माजी आ. विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
देशातील नऊ राज्यात आता आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून त्यात महाराष्ट्र राज्य आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार असल्याची माहिती आप चे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय कुंभार आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती.
ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे.
सातारा तालुक्यातील राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यासाठी 17 जुलै रोजी मतदान होणार असून 19 जुलैला मतमोजणी होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपुर, म्हसवड या आठ व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. सवोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
अपेक्षित प्रतिसाद, सहकार्य, चांगला विश्वासू सहकारी गट मिळाला नसल्याने किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतुन स्वाभिमानाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माघार घेतली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हापूर शहराच्या पहिला महिला आमदार व काँग्रेसचे दिवंगत आमदार कै.स्व.चंद्रकांत जाधव आण्णा यांच्या पत्नी श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांची कोल्हापूर उत्तर विधानसभा आमदार पदी निवड झाली आहे. या निवडणुकीत खटावचे राष्ट्रीय काँग्रेस युवा नेते व हरणाई उद्योग समूहाचे सर्वसर्वा रणजितसिंह देशमुख यांनी पक्ष निरीक्षक म्हणून चोख कामगिरी केली. त्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्ह्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासह आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये रयत-अथनी शुगर (कराड), लोकनेते बाळासाहेब देसाई (पाटण) व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (शेंद्रे) यांचा समावेश आहे.
किसन वीर यांनी उभारलेला आणि सध्या आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे कामगारांचे हित जपण्यासाठी सुरु होणे गरजेचे आहे. पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून सर्वांच्या सहकार्याने किसनवीर सातारा साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केला.
कै. मारुती सावजी लांडगे कुस्ती संकुल, (भोसरी) पिंपरी चिंचवड येथे झालेल्या ज्युनियर फ्री स्टाईल मुले, ज्युनियर ग्रीको रोमन मुले व ज्युनियर फ्री स्टाईल मुली राज्यस्तरीय निवड चाचणीत सातारचे सुमित गुजर (खातगुण), महेश कुंभार (बुध) आणि साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
निक निवडणुका जवळ आल्या की, काही लोकप्रतिनिधींना पुसेगावच्या प्रलंबित प्रश्नांची आठवण होते. गावाचे हित, प्रश्न किंवा जबाबदारीचे फारसे सोयरसुतक नसलेले काहीजण वृत्तपत्रांत फोटो झळकण्यापुरताच प्रश्नांना हात घालत आहेत. पण, यामुळे मूळ प्रश्न तडीला न जाता या समस्यांचे गांभीर्य कमी होत आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे पुसेगावकरांना वर्षानुवर्षे अनेक महत्त्वाच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही बाब खूपच चिंतेची झाली असल्याचे मत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जाधव यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले.
सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद दाखवण्यासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप पदाधिकार्यांनी केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी या मागणीला दुजोरा देत भाजपा मोठ्या ताकदीने नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
सातारा जिल्ह्यात शिवसेनेने आपली पाळेमुळे खोल रुजवली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलीकडील इतिहासात शिवसेनेचे २ संचालक निवडून आले आहेत. हे त्याचेच द्योतक असून भविष्यात विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायती, नगरपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर सामोरे जावा अशा सूचना पर्यटनमंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या.
जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव शहर विकास परिवर्तन पॅनेलने १३ जागांवर विजय मिळवत परिवर्तन घडवले असून, एक हाती सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ४ जागांंवर समाधान मानावे लागले आहे. कमी जागा लढवत असलेल्या कॉंग्रेसचे मात्र पानिपत झाले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे.
श्री. छ. प्रतापसिंह महाराज नगर वाचनालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी ग्रंथमित्र पॅनलने सर्वच म्हणजे बाराही जागा जिंकून विरोधकांना धोबीपछाड दिला . विरोधकांनी मिळवलेल्या मतांनी सत्ताधारी गटाला आत्मपरीक्षण करायला लावले आहे.
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा शहर भाजपाबद्दल विपर्यास चर्चा सुरु आहे. भाजपाची विभागणी झाली असून भाजपाचे कार्यकर्ते अर्धे तिकडे व अर्धे इकडे अशा प्रकारची वृत्ते प्रसिध्द होत आहेत. मात्र, भाजपा हा कोणासाठी व कोणाचा तरी पर्याय नसून भाजपा हे स्वतंत्र सत्ता केंद्र आहे.
ठोसेघर, ता. ठोसेघर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध होऊन अध्यक्षपदी नामदेव अवकिरकर, उपाध्यक्षपदी दत्ताराम चाळके यांची वर्णी लागली आहे.
सातारा शहराच्या विकासासह सातारकरांना सक्षम पर्याय देण्यासाठी नवीन चेहरे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज निर्माण करणे हेच उद्दिष्ट असल्याची घोषणा रिपाई (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. आयोग या निवडणुका पुढे ढकलणार का? याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, आता निवडणूक आयोगानं देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इतकंच नव्हे, तर आयोगानं आरक्षणाशिवाय संबंधित २७ टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारीत तारीख देखील जाहीर केली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे राज्य सरकारसोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे.
वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
सातारा जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजनांच्या हक्कासाठी तयारीने उतरणार आहे. जिल्हयातील राष्ट्रीय पक्ष संलग्नित आघाडीशी युती अथवा स्वतंत्र पॅनेल, असे दोन्ही पर्याय रिपाई समोर उपलब्ध आहेत. सहा नगरपंचायतीच्या 102 जागांपैकी किमान 50 जागा ताकतीने लढविणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी ला सुरवात होणार आहे. या नगरपंचायतीना आचारसंहिता लागू झाली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.
तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे.
राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नसतो. त्याचाच प्रत्यय आज फलटणकरांना आला. सातारच्या राजकारणात एकमेकांचे जानी दुश्मन म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी जात खा. उदयनराजेंनी जिल्हावासीयांना पुन्हा एकदा जोर का झटका धीरे से दिया.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न झाला. यामध्ये युवा तालुकाध्यक्षपदी मयूर चव्हाण, तर युवा तालुका उपाध्यक्षपदी शिवम पाटील, कराड तालुका उपाध्यक्षपदी अमर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
गत नगरपालिका निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह सुमारे सहा जागा जिंकल्या. तर अन्य ठिकाणी युती केली. मात्र, यावेळी पालिकेला युती करायची की नाही? यावर सदर बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये आगामी नगरपालिका निवडणुक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून सर्वच्या सर्व 33 जागा पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दीही झाली होती. मंगळवारी दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीत दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यात राजकारण चांगलंच रंगलंय. बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दंड थोपटले आहेत. जिल्हा बँकेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्यांनाच सभासदांनी मतदान करावे.
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १७ उमेदवारांनी विविध मतदारसंघातून आपले २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांशी अर्ज 'प्राथमिक कृषी पतपुरवठा' आणि 'महिला राखीव'मधून दाखल झाले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदचे सदस्य दीपक पवार यांनी प्राथमिक कृषी पथपुरवठा विकास सेवा सोसायटी संस्था जावलीमधून दोन अर्ज दाखल केले आहेत. इतर दोन जणांनीही आज अर्ज भरले असून, बुधवारी 3 वाजेपर्यंत 165 अर्जाची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील सहकारामधील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत फारसे राजकारण नाही, हे सांगायला बरं वाटतं म्हणण्यापेक्षा अभिमान वाटतो. या बँकेच्या माध्यमातुन हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना, सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी संचालकांच्या २१ जागांसाठी मतदान होणार आहे. दि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली जादू कायम ठेवत पुन्हा एकहाती सत्ता मिळविली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या 292 जागांपैकी 216 जागा मिळाल्या असून निर्विवाद बहुमत मिळाले आहे.
राज्यात नुकत्याच विधान परिषदा व ग्रामपंचायतींच्या निर्विघ्न पार पडलेल्या निवडणुका व सहकारी संस्थांमधील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणारी विनंती याचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
मुंबई : राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरानामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. राज्...
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.