जिल्हा रुग्णालय परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या संपूर्ण सुरक्षिततेचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होते.
येथील जिल्हा रुग्णालयात तोतया ब्रदर, फार्मासिस्ट म्हणून वावरणाऱ्या संतोष साळुंखे याचे आज सुरक्षारक्षक पृथ्वीराज गायकवाड त्याच्यामुळे बिंग फुटले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तोतया विरोधात तक्रार देण्याची सूचना पृथ्वीराज गायकवाड याला केली.
सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ अतिदक्षता विभागातील उपचार न मिळाल्यामुळे बसप्पा पेठेतील एका रिक्षा चालकाला जीव गमावण्याची वेळ आली या प्रकरणामुळे संबंधितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली.
सातारा जिल्हा रुग्णालयाच्या सार्वजनिक स्वच्छते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही मदत मिळत नाही. गेल्या दहा महिन्यांमध्ये चौदा वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही हालचाल झाली नाही.
येथील जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वाहनतळावर असलेला पाच हजार रुपये किमतीचा ऑक्सीजन सिलेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव हक्काचे ठिकाण असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारांच्या ओपीडी वेळेआधीच बंद होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचार नक्की घ्यायचे कोठे, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. डॉक्टर नक्की जातात कुठे आणि करतात काय, या विषयावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.
येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोरून एका महिलेच्या हातातील पर्स हिसकावून घेऊन त्यातील १३ हजार रुपये किमतीचे साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी एका अज्ञात इसमावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयाच्या 19 विभागातील स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून पुरेशा स्वच्छते अभावी रुग्णांची ससेहोलपट वाढली आहे. कारण रुग्णालयाला सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक ब्रेक देण्यात आल्याने स्वच्छता यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून त्यांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये ओमिक्रॉनचे 6 रुग्ण जिल्ह्यात आढळल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला. त्याचाच एक भाग म्हणून नव्या व्हायरसने बाधित झालेल्यांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील एक आयसीयू वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत.