dam

esahas.com

Anjali Damania: पेपरवरती दोन्ही पार्टनरच्या सह्या; पार्थ पवारांचं नाव FIRमध्ये घातलं गेलं नाही, हे सगळे वाचवण्याचे धंदे,

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', दमानियांची मागणी

esahas.com

कास धरण उंचीच्या कामाची अधीक्षक अभियंत्यांनी केली पाहणी

नगरपरिषद संचालनालयाच्या अधीक्षक अभियंता पल्लवी सोनवणे यांनी मंगळवारी कास धरण उंचीच्या कामाची पाहणी केली. तसेच प्रस्तावित आराखड्यानुसार सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

esahas.com

कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल.

esahas.com

खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश कदम

जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली  खटाव तालुका मराठी पत्रकार परिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली.

esahas.com

त्यांची 'लक्षवेधी' बोंडारवाडी धरणाला खो घालण्याचा प्रकार

बोंडारवाडी प्रकल्पाचा प्रश्न 2010 पासून भिजत घोंगड्यासारखा पडला आहे. इतक्या वर्षांनी त्यांना लक्षवेधी करण्यासाठी वेळ मिळणे आणि सिंचन विभागाकडूनच हा प्रकल्प व्हावा यासाठी त्यांनी आग्रह धरणे हे तांत्रिकदृष्टया अयोग्य ठरणार आहे.

esahas.com

कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

वाईत अज्ञाताने केले दोन दुचाकींचे नुकसान

वाईत अज्ञाताने दोन दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकसंघ राहणे गरजेचे : संभाजी कदम

खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. परंतु खटाव राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये एकसंघपणा नसल्या कारणाने व पक्षार्तंगत कुरघोडया असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून नेत्यांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे, असे मत भुरकवडी गावचे माजी सरपंच संभाजीराव उर्फ एस. के. कदम यांनी व्यक्त केले.

esahas.com

गेंडामाळ परिसरात घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी

येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून साहित्य व रोख रकमेची चोरी केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कदमआवाड येथे घरफोडी करून ६७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

कदमआवाड (मंद्रूळकोळे) ता. पाटण येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने ६७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

रयत संस्थेच्या सहसचिवांच्या आश्वासनानंतर मनोहर कदम यांचे उपोषण मागे

रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मेनकुदळे यांनी आश्वासन दिल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलेल्या आणि महाविद्यालयासमोर गुरुवारपासून आंदोलन करणाऱ्या मनोहर कदम यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपले उपोषण मागे घेतले.

esahas.com

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अपघातात नुकसान केल्या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा

पुणे-बेंगलोर महामार्गावर गाडीस धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जिल्ह्यातील पाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम-बलकवडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

esahas.com

बांधावरुन गेल्याने दमदाटी

बांधावरुन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याने एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरा बाळु कांबळे रा. कोंडवे ता. सातारा असे त्यांचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

esahas.com

अपहरण करून महिलेच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास पुसेगाव पोलीसांनी केली तीन तासात अटक

छत्रपती शिवाजी चौकातील मोटार पळवून नेऊन लहान मुले व महिलांचे अपहरण करुन महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकास पुसेगाव पोलिसांनी तीन तासात अटक करून गुन्हा उघड करण्यात यश मिळवले आहे.

esahas.com

संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर येथे मुतखड्यासाठीची शस्त्रक्रिया यशस्वी : डॉ. अंबादास कदम

पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामीण भागातील संजीवनी हॉस्पिटल सर्जिकल सेंटर पुसेगाव येथे पी सी एन एल किडनी मधील मुतखड्यासाठी अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

esahas.com

बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

esahas.com

डॉ. अंबादास कदम यांचे कार्य वैद्यकीय क्षेत्रापेक्षाही उज्वल : प.पू. सुंदरगिरी महाराज

श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्यावतीने मठाधिपती प. पु. सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते येथील संजीवनी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉ. अंबादास कदम व  त्यांच्या पत्नी संजीवनी कदम यांना टाईम सायबर मीडिया यांच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट स्त्री रोग तज्ञ म्हणून जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते सत्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

esahas.com

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते डॉ. अंबादास कदम यांना पुरस्कार

पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावच्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर अंबादास कदम यांनी 22 वर्ष स्त्री रोग तज्ञ म्हणून अहोरात्र सेवा दिली. या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली. 

esahas.com

घरात घुसून नुकसान केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

देगांव ता. सातारा गावच्या हद्दीत राहत असलेले नितीन बबन कुंभार वय ४० यांच्या राहत्या घरात घुसून साहित्य, फर्निचर, शेतातील अवजारे, अन्न धान्य बाहेर फेकून दिले. या प्रकरणी ४ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाचा साताऱ्यात मोर्चा

श्रमिक मुक्ती दलाचा विजय असो, एक लाडू दोन लाडू प्रशासनाला येथेच गाडू, बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाचे बापाचे, अशा घोषणा देत कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ५४ गावांसाठी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधावे, या मागणीसाठी जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला.

esahas.com

गेंडामाळ परिसरात फायरिंग करून एकावर वार

येथील शाहूपुरी परिसरात असणाऱ्या गेंडामाळ येथे रविवारी मध्यरात्री एकावर फायरिंग करून कोयत्याने वार केल्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने फायरिंग झाले मात्र पिस्तूलमधून गोळी बाहेर न आल्याने अनर्थ टळला. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

दादा महाराजांचे लोककल्याणकारी विचार आजही प्रेरणादायी

श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह उर्फ दादा महाराज यांनी नगराध्यक्ष म्हणून सातारा शहरासाठी काम करताना लोककल्याणाचा विचार नेहमी समोर ठेवला. त्यांचे विचार आजच्या राजकारणातही आम्हाला सातत्याने प्रेरणादायी ठरत आहेत, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त उदयनराजे यांनी अभिवादन केले.

esahas.com

श्रीमंत छत्रपती दादा महाराज शिष्यवृत्तीची उदयनराजे यांच्याकडून घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग आणि तत्सम स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि त्याकरता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रवेश घेण्याकरता जे शुल्क लागते त्यामध्ये सवलत देण्याचे नियोजन कैलासवासी श्रीमंत छत्रपती दादा महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

esahas.com

कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

कोयना धरण परिसराला मंगळवारी सकाळी ९.४७ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसलाय. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना विभागातील काडोली गावाच्या पश्चिमेला ७ किमी अंतरावर होता.

esahas.com

बोंडारवाडी धरणासाठी सुवर्णकन्या कादंबरीची धाव

राज्यस्तरीय ॲथलेटीक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेली आसनी गावची सुवर्णकन्या कादंबरी मोहन शेलार ही बोंडारवाडी धरणासाठी रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान केळघर- गवडी- मामुर्डी- मेढा दरम्यान अशी धावली. कादंबरीच्या या अभिनव उपक्रमाचे बोंडारवाडी धरण कृती समितीने जाहीर कौतुक केले.

esahas.com

बोंडारवाडी धरणाचा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार : डॉ. भारत पाटणकर

जावली तालुक्यातील केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे. जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने एक वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

esahas.com

या धरणावर गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करत नाही, नक्की कोणते ठिकाण आहे हे?

जगाचा सगळा समतोल हा गुरुत्वाकर्षणामुळे टिकून राहिला आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते तर तिथे किती उठाठेव करावी लागते हे आपण पाहतोच. जग हे पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे हे कुणीही नाकारणार नाही. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात गुरुत्वाकर्षणाचा नियम काम करतो हे तर सर्वांनाच माहित आहे. पण हे पूर्णपणे खरे आहे का? तर नाही. आज एका अशा ठिकाणाची ओळख तुम्हाला होणार आहे जिथे गुरुत्वाकर्षण कामच करत नाही.

esahas.com

शहीद तुकाराम ओंबळे हे केडंब्याचे नव्हे तर ते देशाचे सुपुत्र : नितीन बानुगडे-पाटील

तुकाराम ओंबळे हे फक्त केडंबे गावचे नव्हे तर ते या देशाचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांचा शौर्याचा हा दिवस शासकीय इतमामात झाला पाहीजे. तरच येणाऱ्या पिढीमध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती निर्माण होईल, असे उद्गार शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी काढले.

esahas.com

कण्हेर धरणातील सहा टक्के पाणी अडवून परिसरातील नागरिकांना बंद पाईपलाईनने पाणी द्यावे : डॉ. भारत पाटणकर यांची मागणी

कण्हेर, ता. सातारा येथील धरणातून वर उचलावयाचे सहा टक्के पाणी अडवून उताराच्या बंद पाईपलाईनने संबंधितांना देण्यात यावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका सुरु

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली.

esahas.com

अल्पवयीन मुलीस पळवले

सातारा येथील धनगरवाडी परिसरात असणाऱ्या श्रीकृष्ण कॉलनी येथून चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार एका महिलेने दिली आहे.

esahas.com

बोंडारवाडी धरणासाठी वेळप्रसंगी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार : डॉ. भारत पाटणकर

जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरणासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, त्यासाठी आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करावे लागले तरी चालेल, मी तुम्हाला तुमच्या हक्काचे धरण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठी मला तुमची शेवटपर्यंत साथ हवी, असे आवाहन श्रमिक मुक्तीदलाचे प्रणेते व धरणग्रस्त संघटनेचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावच्या नागरिकांना केले.

esahas.com

बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार 

मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्‍याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्क्यांच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे. जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षांपूर्वीच बंद पडला असून, भागातील दुग्धव्यवसाय पूर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरुण वर्ग शहरात स्थलांतरित

esahas.com

नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होतो

‘कोरोनामुळे शाळा बंद आहेत, त्यात मुलांना कोठेही जाण्याचे फिरण्याचे बंद असल्याने त्यांचे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य सुरळीत करण्यास नृत्य किती फायदेशीर आहे. नृत्यामुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचाही व्यायाम होत असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींनी नृत्य केल्यास आपले स्वास्थ्य निरोगी राण्यासाठी मदत होईल,’ असे मत यावेळी अभिनेता दिग्दर्शक महेश सोनावणे यांनी व्यक्त केले.

esahas.com

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा

जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत ना. पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव त

esahas.com

धरणाच्या कामामुळे कास-बामणोली रस्ता वारंवार होतोय बंद

कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी कोरघळ एकीवमार्गे वळवण्याच्या हालचाली संबंधित विभागाच्या सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह 20 किमीचे अंतर वाढत असल्याने मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने या निर्यणाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांतून जनक्षोभ उसळू लागला असून कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस

esahas.com

अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेतल्यास संभाव्य नुकसान टाळणे शक्य

‘मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊन शेतकर्‍यांनी वेळीच उपाययोजना केली तर या अळीचा प्रादुर्भाव रोखणे व मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते,’ असे मत कृषी सहायक  राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.

esahas.com

वाढत्या वाहतुकीमुळे सुरवडी-साखरवाडी रस्ता खचला

सुरवडी-साखरवाडी रस्त्यावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत चालली असून, हा रस्ता अवजड वाहतुकीमुळे जागोजागी खचला आहे. रस्त्यावर जागोजागी अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

esahas.com

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे शेतातील पिकात पाणी साचून घेवडा, वाटाणा, बटाटा यांसह आणखी काही पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.

esahas.com

पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्ण बंद

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला असून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक विसर्ग सूरू आहे. धरणात सध्या 91.63 टीएमसी पाणीसाठा आहे.

esahas.com

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटावर

तीन दिवसानंतर मुळगाव पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या लगत असणारे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने हे भलेमोेठे झाड बाजूला केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरळीत झाली.

esahas.com

संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

esahas.com

पावसाचा जोर कायम: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविणार

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसचे प्रमाण गेल्या 4 तासात वाढले आहे. पाण्याची आवक पहाता उद्या दि. 16/8/20 रोजी सकाळी 10 वाजता एकूण विसर्ग 25000 cusecs करावा लागेल.

esahas.com

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट नऊ इंचावर

कोयना धरणाचे 6 वक्रद्वारे 1 फूट 9 इंच उचलण्यात आली आहेत. सांडव्या वरून 9360 क्युसेक्स व धरण पायथा विजगृह मधून 1050 क्युसेक्स असा एकूण 10410 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे

esahas.com

वीर धरण 97.48 टक्के भरले

सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवर असणार्‍या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे वीर धरण भरण्याच्या मार्गावर असून बुधवारी संध्याकाळी चार वाजता वीर धरणाचा पाच नंबरचा दरवाजा एक फुटाने उचलुन एक हजार 200 क्युसेस तर विद्युत गृहातूनही आठशे क्युसेक्स पाणी नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.