covid

esahas.com

वडूज मध्ये जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मनसेची मागणी

खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा

कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी.

esahas.com

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला मायेचा हात

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना "अर्थसहाय्य योजना" या योजनेंतर्गत कोविड कालावधीत कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे. या योजनेंतर्गत ही एकरकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

esahas.com

काशीळच्या कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना मिळणार चांगली आरोग्य सुविधा

‘काशीळ येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशीळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत,’ असा विश्‍वास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

esahas.com

वडूज येथे रणजितसिंह देशमुख उभारणार कोविड सेंटर; सर्वसामान्य रुग्णांना मिळणार दिलासा

कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.

esahas.com

क्रीडा संकुलातील कोविड हॉस्पिटलमुळे रुग्णांना दिलासा मिळणार

‘राज्यासह जिल्ह्यात दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्‍चितच एक दिलासा मिळणार आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.

esahas.com

डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून चैतन्य रुग्णालय कोविडसाठी हस्तांतरित

गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.

esahas.com

ना. एकनाथ शिंदे धावले जावळीकरांच्या मदतीला

जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे तसेच बामणोली येथेही 10 बेडच्या रुग्णालय उभारणी करावी, असा आदेश राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिल

esahas.com

‘वाई अर्बन बँक’ परिवाराकडून कोविड केअर सेंटरसाठी 100 बेड

‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्‍विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली. 

esahas.com

आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून पुसेगाव कोरोना सेंटरची पाहणी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटर 30 ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी 10 लाख निधी दिला आहे. ऑक्सिजन बेडच्या लाईनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील. तसेच अपुर्‍या असणार्‍या सुविधांसाठी आमदार फंड

esahas.com

पाचगणी येथील कोविड सेंटरला आ. मकरंद पाटील यांची भेट

पाचगणी डॉन अ‍ॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले.

esahas.com

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर फलटणमध्ये उभारणार 75 बेड्सचे कोरोना सेंटर

‘सध्या फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांना सध्या फलटणमध्ये कोरोना उपचारासाठी बेड्स मिळत नाहीत. अशी सर्व परिस्थिती असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे स्वखर्चाने फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच रविवार पेठेमधील उत्कर्ष लॉज येथे 75 बेड्सचे कोरोना केअर सेंटर सुरू करणार आहेत,’ अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली.

esahas.com

माण व खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर उभारणार

वाढत्या कोरोना पार्श्‍वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

esahas.com

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश मोडल्याप्रकरणी दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दिलेले आदेश धाब्यावर बसवणार्‍या सातार्‍यातील दोन व्यापार्‍यांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल बाळासो पवार वय 27 वर्षे रा. यवतेश्‍वर ता. जि. सातारा आणि संतोष किसन जाधव वय -45 वर्षे रा अंबवडे, ता. सातारा अशी त्यांची नावे आहेत.

esahas.com

रुग्णसेवेसाठी पुष्कर कोविड केअर सेंटर पुन्हा सज्ज

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग

esahas.com

सातार्‍यातील मासभवन येथे कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे. 

esahas.com

पाचगणी कोविडमुक्त करण्यास पालिका सरसावली

कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्‍या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.

esahas.com

‘सोना अलाईज’ कंपनीतर्फे 21 टन ऑक्सिजनची निर्मिती

‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.

esahas.com

मलटण येथे 50 बेडचे कोविड सेंटर; नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकार

फलटण तालुक्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील मलटण परिसरात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरसेवक अशोकराव जाधव यांचा पुढाकारातून व श्री कृपा सिंधू स्वामी समर्थ सेवा मंडळ, मलटण यांच्या माध्यमातून येथील स्वामी समर्थ मंदिर येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.

esahas.com

दिगंबर आगवणे जमीन विकून उभारताहेत 100 ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर

आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक

esahas.com

‘सजाई गार्डन मंगल कार्यालया’त साकारतेय शंभर बेड्सचे कोरोना केअर सेंटर

सध्या फलटणमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आगामी काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. फलटणमध्ये असणार्‍या आरोग्य यंत्रणेवर आता ताण येऊ लागला आहे. फलटणमध्ये सध्या बेड्स मिळणे सुद्धा अवघड झालेले आहे. हे जाणूनच फलटणकरांच्या मदतीला उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे हे धावून आले आहेत. नंदकुमार भोईटे यांच्या सजाई गार्डन मंगल कार्यालयात नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने 100 बेड्स असलेले कोरोना केअर सेंटर उभारून प्रशासनाकडे हस्त

esahas.com

उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली सुविधा उभाराव्यात

मुंबई : कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखी...

esahas.com

प्रत्येक ज्येष्ठांनी कोरोना लस घेण्यासाठी आग्रही राहावे

‘महाबळेश्‍वर तालुका हा अतिदुर्गम असल्याने सर्व तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला कोरोना लस मिळायला हवी, याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी व प्रत्येक ज्येष्ठांनी ही लस घेण्यासाठी आग्रही राहावे,’ असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी केले.

esahas.com

वर्णे येथे शिवजयंती मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोरोना साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंतीनिमित्त मिरवणुका न काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यानी काढूनही मिरवणूक काढल्याप्रकरणी वर्णे (ता. सातारा) येथील 19 जणांसह अज्ञात 15 ते 20 जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

esahas.com

‘स्वच्छ सर्वेक्षण जनजागृती’ स्पर्धेत ‘कोविड योद्धा’ लघुपटाला प्रथम पारितोषिक

पाचगणी पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत जनजागृती स्पर्धेमध्ये युवासेनेचे महाबळेश्‍वर तालुकाध्यक्ष नितीन भिलारे दिग्दर्शित ‘कोविड योद्धा’ या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले.  कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्‍या योद्ध्यांचे मनोबल वाढावे यासाठी

esahas.com

आ. शिवेंद्रसिंहराजे व कुटूंबीयांकडून 80 बेडचे कोव्हीड केअर सेंटर 

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबियांनी स्वमालकीच्या विसावा नाका येथील पुष्कर हॉल येथे स्वखर्चाने 80 बेडचे सुसज्ज असे कोव्हीड केअर सेंटर उभारले आहे. या सेंटरमध्ये 40 बेड हे ऑक्सिजन पुरवठ्यासह सुसज्ज असून उर्वरीत 40 बेड विना ऑक्सिजनयुक्त आहेत. 

esahas.com

जिल्ह्यात 12 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

जिल्ह्यात बारा बाधितांचा उपचादरम्यान मृत्यू झाल्याने काळजीत भर पडली आहे.

esahas.com

कोरोना काळात ब्रह्मपुरी कोविड सेंटरमधील कर्मचार्‍यांचे कार्य कौतुकास्पद

‘सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सेवाभावी वृत्तीने देखभाल करणार्‍या कर्मचार्‍याचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन सिद्धेश्‍वर पुस्तके यांनी व्यक्त केले.

esahas.com

पाटणमधील कोविड सेंटर ठरताहेत हुल्लडबाजीचे केंद्र

कोरोनाने पाटण शहरामध्ये चांगलाच तळ ठोकला असून पाटणची साखळी वाढतचं चाललेली आहे. कोरोना बाधित लोकांची सोर पाटण मधील चार कोविड सेंटरमध्रे केली जात आहे. मात्र रा कोविड सेंटर मधील उपद्रवी हुल्लडबाज तरुण इथंही आपल्रा अवगुणांचे चित्रण करुन प्रशासनास नाहक त्रास देत आहेत.