प्रतापगंज पेठ येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरू असताना वीज वितरण कार्यालयासमोरील जुन्या पुलाला भगदाड पाडण्याचा उद्योग ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. हे पाप झाकण्यासाठी घाईघाईने त्यावर माती टाकून ते पत्र्याने बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांनी याबाबतीत प्रशासनाचे लक्ष वेधून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
एका अन्न पुरवठा ठेकेदाराने थेट केंद्रीय अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांसमक्ष दमबाजी करण्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी बैठक तर शांततेत झाल्याचे सांगत कानावर हात ठेवले.
कोरोना काळात सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागाने अत्यंत उत्कृष्ट काम करत परिस्थिती आटोक्यात आणली असतानाच याच परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या अपप्रवृत्तींच्या 'लिला' आता पुढे येत आहेत.
सातारा पालिकेच्या तिजोरीत वसुलीचा वेग मंदावल्याने पुरता खडखडाट झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले काढताना लेखा विभागाची प्रचंड कसरत होत असून ठेकेदारांच्या गर्दीमुळे येथील कर्मचारी घायकुतीला आले आहेत. प्राप्त माहितीनुसार तब्बल साडेचार कोटी रुपयांची बिले ठेकेदारांची अडकून पडली आहेत.
सातारा: सातारा शहरातील पोवई नाका परिसरात असलेल्या शासकीय गोदामाचे दुरुस्तीचे काम दोन महिन्यापूर्वी करण्यात आले. पहिल्याच अवकाळी पावसात या इमारतीवरील दुरुस्ती करण्यात आलेले पत्रे उडून गेले. त्यामुळे गोदामातील धान्याचे नुकसान झाले असून अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा जनहितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टी पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार सागर भोगावकर यांनी दिला आहे.
सातारा पालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम सरसकट बनवणाऱ्या ठेकेदारांची बिले लेखा विभागाकडून सर्रास काढली जात आहेत. याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली आहे. लेखाधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्याने केल्याने विभागात एकच खळबळ उडाली आहे.
सातारा पालिकेच्या शहापूर पाणी योजनेच्या दुरुस्ती आणि देखभालीचे काम करणाऱ्या सातारा इलेक्ट्रीकल्स या कंपनीच्या नावाखाली काम करणाऱ्या ठेकेदारास अखेर पालिकेच्या स्थायी समितीने काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठेकेदार आणि त्याच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी पालिकेच्या सभेत अनेकवेळा चर्चा झाली होती, मात्र तो ठेकेदार राजकीय वरदहस्ताच्या जोरावर आपल्यावरील बालंट टाळण्यात प्रत्येकवेळी यशस्वी होत असे.
विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.