आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्...
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र असून भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. रा...
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुकास्तरावर काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करा. प्रत्येक तालुक्यात बूथ कमिटी, मंडल कमिटी, आणि ग्रामसमित्या एक स्थापन करून प्रत्येक आठवड्याला दोन जिल्हा परिषद गटात बैठका घ्याव्यात. कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा अशा सूचना आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा
मोदी सरकारचा हुकुमशाही व भ्रष्ट कारभाराचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या निषेधार्थ सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने निदर्शने करत निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना कार्यात घ्यावी, यासह विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
महिलांचे संघटन अधिक मजबूत करुन काँग्रेसची विचारधारा जिल्ह्यात आणखी गतीमान करण्याचे काम माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे.
महागाई व जीवनावश्यक वस्तुवरील कर वाढविल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनासमोर निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.
सातारा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना माफी वीर ठरवणाऱ्या सुधांशू त्रिवेदी भाजप राष्ट्रीय प्रवक्ता व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला. पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेवर जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
देशातील बेरोजगारी आणि महागाई विरोधात सातारा जिल्हा काँग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भाकरी थापल्या. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.
केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांना चौकशीच्या नावाखाली आज 26 जुलै रोजी ईडी कार्यालयात पुन्हा दुसऱ्या वेळी बोलावून त्रास देण्याचा व पोलीसिबल वापरून दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून सलग दोन ते तीन दिवसांपासून चौकशी होत आहे. या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारकडून ईडीसह केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या हुकूमशाही आणि दबावतंत्रविरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीवतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
भाजपला फार मोठा इतिहास आहे. कार्यकर्त्यांनी अत्यंत संघर्ष करून हा पक्ष उभा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील यांनी सातारा जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी काम करण्याची मला संधी दिली. सर्व जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी पुढे जाणार असून भविष्यात ७५ टक्के काँग्रेस भाजपमध्ये दिसेल असा विश्वास भाजपचे आमदार आणि सातारा जिल्हा भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस सेवक व सातारचे सुपुत्र दीपक मोतलिंग यांचा सत्कार करण्यात आला. गेली पस्तीस वर्षे ते काँग्रेस भवन येथे सेवा बजावत आहेत.
सातारा तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वेळे कामथी , ता.सातारा येथील संदीप प्रल्हादराव चव्हाण यांची नियुक्ती केल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. जाधव यांनी म्हटले आहे, संदीप चव्हाण हे नव्या पिढीचे आश्वासक प्रतिनिधी आहेत.
फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना प्रभावीरितीने राबवाव्यात, या प्रमुख मागणीचे निवेदन अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटणच्या वतीने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.
सोनीया गांधी यांच्या घरी जवळपास 5 तास चालेल्या या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवन बंसल म्हणाले, पक्षाला राहुल गांधी यांची गरज आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या वेळी बैठकीला संबोधीत केले.
कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्याचा अडमूठेपणा करत आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र अशा गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या हटवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधी आंदोलन करण्यात आले.