पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीमध्ये बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई, रत्नागिरी, रायगड, अलिबाग, सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये श्री स्वामी समर्थ मठांची स्थापना करणारे आणि राज्यभरात मोठ्या संख्येने शिष्य, अनुयायी असलेल्या नवनीत्यानंद महाराज (मोडक महाराज) यांचे पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत मोटार रस्ता दुभाजकावर आढळून झालेल्या अपघातात निधन झाले.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंटेनरमधील अज्ञात चालकाने इरटीका कारला धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी कंटेनर चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा शहरानजीक ट्रक व कारचा अपघात झाला. ही घटना दि. 1 रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी नितीन दिलीप कुलकर्णी (ठाणे) यांनी ट्रक चालक अर्जुन रावसाहेब गायकवाड (वय 33, रा.गंगापूर, औरंगाबाद) याच्याविरुध्द तक्रार दिली आहे.
जावळी तालुक्यातील मेरुलिंग मेढा घाटात रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास इर्टिका कार मेरुलिंग घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून पलटी झाली. या अपघातात तीनजण जागीच ठार तर पाचजण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
पाचगणी-महाबळेश्वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत.