84 मुले दुबई मध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते,सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.
शेतीच्या जमिनीवर घर किंवा इतर कुठले बांधकाम करायचे असेल, तर आता त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अकृषिक वापरासाठीची म्हणजे NA परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आलीय.
तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रतिमेची मिरवणूक करून साजरी करण्यात येणार आहे.
सध्या होणारी टोल वसुली आणि टोल देऊन प्रवासाचे होणारे हाल याच विदारक चित्र
भारतातील प्रमुख नद्या महामार्ग होणार आहेत. बजेटमध्ये 20 नव्या जलमार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातं अत्यंत जिव्हाळ्याचे होते.
लोणी–काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहे. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा–मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालि...
अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती.
३०० नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक सक्षमीकरण यांच्यावर केंद्र सरकारचे लक्ष - मुरलीधर मोहोळ
निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यात आली असून 15 जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणातही 50 टक्क्यांचा निकष पाळण्यात आलेला नाही असा आक्षेप सुप्रीम कोर्टात नोंदवण्यात आला आहे.
आपलं चिन्ह कमळ आहे. आता घड्याळाची वेळ चांगली नाही. आता इकडे तिकडे बघू नका. हातातले घड्याळ वेगळं आहे असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली.
Supreme Court Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (१५ नोव्हें.) महाबळेश्वरमध्ये आले होते.शिंदेंच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील तिथे उपस्थित होते.विकासकामांवर बारीक लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांनी देसाईंना दिल्या.येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, असे शिंदे म्हणाले....
ISRO Mission Moon : भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय घडणार? चीनमागोमाग भारत करणार जगाचे डोळे दीपवणारं काम.... इस्रोनं सविस्तर माहिती देत काय म्हटलंय पाहाच...
राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार आहे.
साताऱ्यात नगराध्यक्ष पदासाठी अभिजीत बिचुकले यांनी नामनिर्देशन पत्र भरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना बैठका, दौरे सुरु केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील काही भागात बिबट्यांच्या दहशतीनं जगणं कठीण झालं आहे. स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.
पुण्यातील रहदारीच्या आणि प्रसिद्ध अशा नवले ब्रीजवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', दमानियांची मागणी
नेपाळच्या आंदोलकांनी संसद पेटवली असून केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनाम दिला आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आता सत्तांतर होणार असून नवीन नेतृत्व उदयास येणार आहे.
Kaas Pathar: कास पठार फुललेला आहे. तिकडे आवर्जून फिरायला जायला हवं. यासाठी लागणारी माहिती जाणून घ्या.
Manoj Jarange Patil : तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
काल चंद्रग्रहण सुरु होण्यापूर्वी लालबागचा राजाचे विसर्जन करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली होती. लालबागचा राजा तब्बल 12 तास समुद्रात बसून होता.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त
महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला होता, राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे.
पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे – ०७ येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना काल पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. या रेव्ह पार्टीमधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केल्याचीही माहिती मिळतंय. आता यावर रोहिणी खडसे यांनी भाष्य केले.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 च्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट जारी केली आहे.
Bank Holiday On 27 June 2025: उद्या शुक्रवारी 27 जूनला सर्व सरकारी आणि खासगी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुमची बँकेची काही कामं असतील तर आजच करुन टाका.
13 स्थानके असतील, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांना मेट्रोशी जोडतील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या प्रकल्पाचा एकूण अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये इतका असून तो भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये समान प्रमाणात वाटून घेतला जाईल. हा धोरणात्मक प्रस्ताव विद्यमान कॉरिडॉ...
हवामान अपडेट : राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार आहे . पुढील चार दिवस हवामान विभागाने पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहेत .
पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने पुण्यात आंतर-माध्यम प्रसिद्धी आणि समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन
इस्रायल-इराण युद्ध सुरु असताना भारताने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने संधी साधली आहे. भारत ऑपरेशन सिंधूचा विस्तार करणार आहे. आपल्यासोबत आणखी दोन देशांच्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणार आहे.
पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण
Banking Rule Change : बॅंकिंग मध्ये 1 जुलैपासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर
Fastag Annual Pass In Maharashtra: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगरव्यावसायिक वाहनांसाठी 3 हजार रुपयांत फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले होते की 12 ते 17 जून दरम्यान एअर इंडियाने बोईंग 787 विमानांसह 66 उड्डाणे रद्द केली.
मोठ्या सुट्टीवर गेलेला मान्सून आता पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होत असल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढला असून या भागांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, विदर्भात मात्र पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी आहे.
Aadhaar UIDAI New Updates: या नव्या बदलांसंदर्भातील माहिती युआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी दिली आहे.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली आहे. यावर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
Indrayani Kundmala bridge collapse: मावळ तालुक्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला होता. त्यामुळे 20 ते 25 जण नदीत वाहून गेले होते. चार जणांचा मृत्यू.
महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेली BPMS प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या प्रमाणे राम भरोसे चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्याबरोबर व्यावसायिकांना आर्थिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
बोगस खते किंवा कीटकनाशके बनवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल : शिवराज सिंह चौहान "कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार करावे मार्गदर्शन” “महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील असून त्यांनी स्वतः संशोधनातून शेतीचे आधुनिकीकरण केले सुनिश्चित”बोगस खते किंवा कीटकनाशके बनवणाऱ्या आणि शेतकऱ्यांना पुरवणाऱ्या कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल : शिवराज सिंह चौहान "कृषी शास्त्रज्ञांनी शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या गरजेनुसार करावे मार्गदर्शन” “महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतीशील असून त्यांनी स्वतः संशोधनातून शेतीचे आधुनिकीकरण केले सुनिश्चित”
Tanisha Bhise Death Case : पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली आहे.
राज्याचे शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, राज्यमंत्री पंकज भोयर हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी परीक्षा केंद्रावर धाड टाकली.
Raj Thackeray: राज ठाकरे यांनी आज मुंबईमध्ये मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीवरचं आपलं मौन सोडलं आहे.
Political News : महत्त्वाच्या कार्यक्रमात अमित शाह यांच्यासमवेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. राजकारणात नव्या समीकरणाचे संकेत मिळताच असंख्य चर्चांना उधाण.
Kho Kho World Cup : भारताने पहिल्या खो-खो विश्वचषकावर नाव कोरले आहे.
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस), पुणे द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 जानेवारी2025 रोजी ‘स्टँडर्ड्स कॉन्क्लेव – औद्योगिक संगोष्ठि’ चे होटल लेमन ट्री येथे आयोजनकेले. या कार्यक्रमात औद्योगिक जगतातील व्यक्तींनी, विविध प्रयोगशाळांनी व सरकारीविभागातील अधिकारी यांनी उपस्थिति लावली व कार्यक्रमात 100 हून अधिक प्रतिनिधींनीउत्साहाने सहभाग घेतला.
Saif Ali Khan Knife Attack : सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यापासून आतापर्यंत काय-काय घडलं, हे जाणून घ्या.
ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले वैयक्तिक पदक जिंकून देणारे कोण? या प्रश्नाचे उत्तर 1980 च्या दशकात कोणालाच ज्ञात नव्हते. आजच्यासारखी सोशल मिडिया, इंटरनेट नसल्याने देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकूनही खाशाबा जाधव हे नाव काळाच्या प्रवाहात लुप्त झाले होते. 2000 मधील सिडनी ऑलिम्पिकपासून खाशाबांच्या नावाचा जयघोष हळूहळू दुमदुमू लागला. तो लेखक, पत्रकार व क्रीडा अभ्यासक प्रा. संजय दुधाणे यांच्या अथक प्रयासामुळे. 2001 मध्ये खाशाबा जाधव यांची केवळ चरित्रगाथा लिहून दुधाणे थांबले नाहीत, तर गेली 25 वर्ष खाशाबा हे नाव अजरामर होण्यासाठी झट तूनच आज 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे.
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या मुख्य गाभा-यातील प्राचिन शिळांना तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय तंत्रज्ञानावर) कृषी क्षेत्रात वापर करताना उसाची लागवड बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली आहे.
तिबेटमध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून रिपोर्टनुसार आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 62 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे निर्णय: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील चारचाकी वाहनधारकांच्यादृष्टीने मोठा निर्णय.
Lonavla Khandala News : नको ते धाडस केल्याने पर्यटक तरुण खंडाळा दरीत भरकटला सहा तासांच्या रेस्क्यु ऑपरेशननंतर... पाहा नेमकं काय घडलं
griculture News : 2024 हे वर्ष कृषी क्षेत्रासाठी उत्कृष्ट ठरले आहे, कारण वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या क्षेत्राने 2.7 टक्के चांगली वाढ नोंदवली आहे. 2024 मध्ये चांगला पाऊस आणि पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील बंपर शेती 2025 मध्ये धान्य उत्पादनात नवीन विक्रम निर्माण करेल. नवीन वर्षात कृषी क्षेत्र तंत्रज्ञानाने सज्ज होईल, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगसह ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे.
Walmik Karad: पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीचे पथक वेगाने तपासाची चक्रे फिरवत आहे.
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Chhatrapati Shivaji Maharaj: भारतीय लष्कराने चीनच्या सीमेलगत छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आहे. लडाखमधील पँगाँग तलावाच्या काठावर 14,300 फूट उंचीवर पुतळा बसवण्यात आला आहे.
संतोष देशमुख बीड मोर्चा: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा सुरू आहे.
भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा बुकिंग करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन बुकिंग काल (26 डिसेंबर ) पहिल्याच दिवशी बुक झाल्या आहेत.
Sharad Pawar on Manmohan Singh : मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्या सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे होती. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या वर्षीच मिळणार आहे.
Maharashtra Cabinet Minister: मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालं आहे.
विश्वनाथ आनंद नंतर भारताला बुद्धीबळात दुसरा वर्ल्ड चॅम्पियन मिळाला तो म्हणजे डी गुकेश.
मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे. नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत, विधिमंडळ अधिवेशनाची प्रथा असते.
Sanjay Raut on Sharad Pawar : उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक :साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनला अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Devendra Fadnavis on Rahul Narwekar : नाना पटोलेंचे विशेष आभार, तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
Maharashtra Ekikaran Samiti : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर दूधगंगा नदीवर नाकाबंदी केली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव रॅलीचे आयोजन करण्यात आल्याने कर्नाटक पोलीस सतर्क आहेत.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर, राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे.
नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली.
Cancer research : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी आणि जीनोमिक्स आणि बायोइन्फॉरमॅटिक्समध्ये आघाडीवर असलेल्या स्ट्रँड लाइफ सायन्सेसने कॅन्सरबाबत मोठं संशोधन केलं आहे.
फलटण : ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत “प्रभू श्रीरामचंद्र की जय,प्रभू श्रीरामचंद्र की जय..” च्या नामघोषात परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.
एकनाथ शिंदे : मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.
महाराष्ट्र: महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल.
PAN 2.0 Project : सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...
Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहरात होणारी तापमानाची घट अद्यापही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतील कैक भागांमध्ये तापमान 16 अंशांवर पोहोचलं असून, मागील आठ वर्षांमधील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून पारा 8 अंशांवर घसरला आहे. राज्यात नाशिक, निफाड, धुळे आण...
हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधीच शरीरात दिसणारी हृदयविकाराची पूर्व लक्षणे ओळखा, जेणेकरून तुमचे किंवा इतरांचे प्राण वाचवणे सोपे होऊ शकते.
टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Srilanka) यांच्यात तीन टी-20 सामन्यांची आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेत 27 जुलौपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया लवकरच श्रीलंकेसाठी रवाना होणार आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत माजी क्रिकेटपटूची हत्या झाली आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर धम्मिका निरोशन (Dhammika Niroshan) याची हत्या ...
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 जुलैपासून सुरू होत आहे. विरोधकांनी पुन्हा सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्याचवेळी राज्यसभेत भाजपच्या 86 जागा आहेत आणि मित्रपक्षांसह एनडीएकडे 101 जागा आहेत. चार वर्षांनंतर भाजपचे संख्याबळ 90च्या खाली गेले आहे. 13 जुलै रोजी पक्षाचे 4 नामनिर्देशित सदस्य निवृत्त झाले. राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या 245 आहे. सध्या 226 खासदार आहेत. यामध्ये बहु...
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास दीड तास ही या नेत्यामंध्ये बैठक चालली. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यांची माहिती दिली.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले श्री.विनोद वैजनाथ चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट अ या संवर्गात पदोन्नती झाली असून त्यांची पदस्थापना प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे करण्यात आली आहे. श्री. विनोद वैजनाथ चव्हाण यांनी सातारा येथील आरटीओ चा चेहरा मोहरा बदलून सर्वस...
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर मविआने 30 जागांवर विजय मिळवला आहे. हेच समीकरण विधानसभानिहाय लागू केल्यास आगामी निवडणुकीत मविआ 150 जागा जिंकू शकते.
45 सातारा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्यापेक्षा 32 हजार 771 इतकी मते अधिक मिळाली. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रमाणपत्र दिले. यावेळी निवडणूक निरीक्षक सुरेन धिरण व आ...
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यावर सातारा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्र राजेंना कॅडबरी भेट दिली. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जी कॅडबरी दिली, त्या कॅडबरीवर I love you असं लिहिलं होतं. इतकंच नाही तर बाईट झाल्यावर उदयनराजे...
काँग्रेसच्या काळात लोकांना दोन वेळेचं अन्नही मिळत नव्हतं. अनेकांना डोक्यावर छप्परही नव्हतं. अशा काँग्रेसी मनोवृत्तीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी तयार करून निवडणूक लढवणे सुरू केले आहे, अशा महाभकास आघाडीला घरी बसवा, असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या सरदारांच्या वंशजांतर्फे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुतीच्या शिष्टाचाराच्या पाठीशी राहायचे की भ्रष्टाचारी लोकांना मदत करायची, हे जनतेनेच ठरवावे, असे प्रतिपादन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. येथील श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला.
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड, तालुका कराड येथील स्मृतिस्थळाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन अभिवादन केले.
जिल्ह्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेने महायुतीला जाहीर पाठींबा दिला. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळून देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद प्रयत्न करेल, असा विश्वास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव व भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. पंडित राठोड यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदार संघातील समस्त धनगर समाजाच्या वतीने, दि. 7 मे रोजी होणा-या निवडणुकीत, सातारा जिल्हयाचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नेते आणि भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठींबा महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीने घोषित केला आहे.
वाई तालुक्यातील खंडाळा आणि भुईंज या दोन्ही किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या भवितव्यासाठी मी आमदार मकरंद पाटलांना लागेल ती मदत करायला तयार असून त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन, असा विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.