accidentnearkhambhatkitunnel

esahas.com

खंबाटकी बोगद्याजवळ विचित्र अपघात; एक ठार, सहा जखमी

साताऱ्याहून पुण्याकडे जात असताना खंबाटकी बोगद्यानजीक धोम बलकवडी कॅनॉलजवळील उतारावर दुचाकीस्वार सचिन कैलास गिरमे रा. सासवड, जि. पुणे हा घसरून पडला. त्यावेळी पाठीमागून येणारा मालट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत या अपघातातील दुचाकी पोलिसांनी रस्त्यावरून बाजूला घेत मृतास रुग्णवाहिकेमधून खंडाळा रुग्णालयात पाठवले. दोन्ही अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाले.