youthinjuredinelectricshockwhileerectinghoardings

esahas.com

होर्डिंग लावताना विजेच्या धक्क्याने युवक जखमी

येथील भूविकास बँकेच्या चौकात शिवजयंती चे बॅनर लावताना विजेच्या धक्क्याने एक युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या युवकाला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.