whybotherwithmahatmaphulesculpting

esahas.com

म. फुलेंच्या शिल्पसृष्टीबाबत उदासिनता का ? : अरुण जावळे

छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे व सर्वप्रथम शिवरायांची जयंती साजरी करणारे समाजक्रांतिकारक जोतीराव फुले यांची कटगुण ही कुलभूमी आहे. त्यांच्या पत्नी अर्थात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे यांचे नायगांव ही जन्मभूमीही याच जिल्ह्यात आहे. सातारच्यादृष्टीने या दोन्ही गोष्टी अभिमानास्पद व गौरवपूर्ण अशाच आहेत.