whattoeatwithwhichfruitandwhattoavoid

esahas.com

कोणत्या फळासोबत काय खावं आणि काय टाळावं? फळं अंगी लागावी असं वाटत असेल तर लक्षात ठेवा हे नियम

फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पोषणमुल्ये असतात. त्यामुळे दररोज एक तरी फळ खायलाच पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यानुसार काही जण नियमित फळं खातातही. पण त्याचा पुरेसा लाभ शरीराला मिळत नाहीये असं काही जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदातही असं सांगितलेलं आहे की आपण जे काही खातो, ते आपल्या अंगी तेव्हाच लागतं, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे काही नियम पाळतो (Food items that should be eaten together). कोणत्या पदार्थासोबत काय खावं आणि काय टाळावं, याचेही काही नियम आहेत. असेच काही नियम फळांच्या बाबतीतही आहेतम्हणूनच या लेखामध्ये आपण कोणते फळ किंवा भाजी कशासोबत खावी, जेणेकरून त्या पदार्थाचे पुरेपूर लाभ आपल्या शरीराला मिळतील, याविषयी जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती इन्स्टाग्रामच्या healthylyfff या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यात सांगितलेल्या खाद्यपदार्थांच्या जोड्या एकमेकांसाठी पुरक असून त्यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी अतिशय पोषक असतं, असं यात सांगण्यात आलं आहे.