wearamaskotherwisepayfivehundredrupees!

esahas.com

मास्क लावा, नाहीतर पाचशे रुपये भरा!

कोरोना संक्रमण वेगाने वाढू लागल्याने सातारा पालिकेने देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पथकाने पहिल्याच दिवशी राजवाडा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या दोघांवर कारवाई करून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला.