wadalaofhadapsarsavedhislifethroughtransplantationinsatara!

esahas.com

हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान !

सुमारे शंभर वर्ष वयाच्या पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई' संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी म्हसवे, (ता. सातारा) येथे या वटवृक्षासोबत अनोखा व्हलेंटाईन डे ' साजरा करण्यात येणार आहे.