wadofhadapsarsavedlifethroughtransplantationinsatara!

esahas.com

हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान !

सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई ' संस्थेला यश आले. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन रहावे म्हणून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत म्हसवे (डी मार्ट जवळ,ता. सातारा) येथे या वटवृक्ष सोबत अनोखा 'व्हलेंटाईन डे' साजरा करण्यात आला.