visapurgaon

esahas.com

खटाव तालुक्यात रंगला खिलारी वासराचा नामकरण सोहळा

विसापूर (ता. खटाव) येथील शेतकरी व माजी सैनिक जगन्नाथ रंगराव साळुंखे यांनी शनिवारी (दि. 13) वासराचे बारसे साजरे करीत अनोखी परंपरा जोपासली. साळुंखे यांच्या खिल्लार गाईला काही दिवसांपूर्वी खोंड झाला. ज्याप्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याचप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्यांनी या वासराचे बारसे गावातील श्री वाघेश्‍वरी व नवलाई देवी मंदिराच्या आवारात मंडप घालून, पाळणा सजवून, पाळणे गाऊन उत्साहात साजरे केले.