vigilanceordertotheadministration

esahas.com

मांढरदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

मांढदरेव येथील श्री काळेश्वरी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. याविषयी तयारीचा आढावा घेण्यासाठी मांढरदेवी येथील एमटीडीसी येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.