veteranactorrameshdeodiesofheartattack

esahas.com

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी ही माहिती दिली. रमेश देव यांनी मराठी तसेच हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केले.