vaccinationofchildrenaged15to18yearsfrom3january

esahas.com

3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दर सोमवार व शुक्रवार या दोन्ही वारी लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

esahas.com

मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून होणार सुरू...

पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे 15ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी 1 जानेवारीपासून करायची संधी मिळणार आहे. पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे.