vaaluupsaanews

esahas.com

कृष्णा, उरमोडीच्या वाळूला फुटतायत रात्रीचे पाय

सातारा तालुक्यातील कृष्णा व उरमोडी या दोन नदीपात्रातून वाळूमाफियांकडून अवैधरीत्या वाळू उपसा केला जात आहे. रात्रीच्या वेळी हा वाळू उपसा केला जात असून, यातून बक्कळ कमाई वाळूमाफीये करत आहेत. मात्र, महसूल विभाग सुस्तच असलेला दिसत आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे.