twoforeignnationalshavebeenremandedinpolicecustodyforfourdays

esahas.com

'त्या' दोन परदेशी नागरिकांना चार दिवसांची पोलीस कोठडी

मलकापूर, ता. कराड येथे  बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार्‍या परदेशी दोन नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली होती.  सदर दोघेही रोमानियाचे नागरिक असून त्यांना सोमवारी 6 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.