twoforeignnationalsarrestedforbreakingintoatms

esahas.com

एटीएममध्ये घुसून संशयास्पद कृत्य करणारे दोन परदेशी नागरिक ताब्यात

बँकेच्या एटीएममध्ये घुसून संशयास्पद कृत्य करणार्‍या दोन परदेशी नागरीकांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी ५ रोजी सायंकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे तब्बल सत्तर बनावट एटीएम कार्ड आढळली आहेत. संबंधित नागरीक रोमानिआ देशातील असल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली आहे.