twoarrestedforrobbingatwowheelerdriverunderthepretextoflift

esahas.com

लिफ्टचा बहाणा करुन दुचाकी चालकाला लुटणार्‍या दोघांना अटक

येथील औद्योगिक वसाहत परिसरात दुचाकी चालकाला लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन, त्याला मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेवून त्याला कॅनॉलमध्ये ढकलून पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे.