twentyyearshardlaborfortorturingaminorgirl

esahas.com

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास वीस वर्ष सक्तमजुरी

कराड तालुक्यातील एका गावात 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. याप्रकरणी न्यायालयाने 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली.