trafficjamsforsometime

esahas.com

बोरणे घाटात कोसळली दरड; वाहतूक काहीकाळ ठप्प

ठोसेघरकडे जाणार्‍या मार्गावरील बोरणे घाटात पावसामुळे गुरुवारी मध्यरात्री दरड कोसळली असल्याने शुक्रवारी सकाळी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, वाहनचालकांसह प्रवाशांनी छोठे-छोठे दगड हटविल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली असून, मोठमोठे दगड अद्याप रस्त्याच्या मधोमधच असल्याने ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत.