torchprocessioninsataraontheoccasionofgirlsschoolcentenary

esahas.com

कन्या शाळा शताब्दीनिमित्त सातार्‍यात मशाल फेरी

अवघ्या सात विद्यार्थींनीवर येथील करंदीकर वाड्यात सुरू झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेचे शताब्दी वर्ष शुक्रवार दि 22 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवाच्या पूर्व दिनी सातार्‍यात पोवई नाका ते राजवाडा ते कन्या शाळा अशी मशाल फेरी काढण्यात आली. या मशालीचे कन्या शाळा शिक्षक वृंद परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.