thosewhodonotknowthespellingofthewordinnovativesatarashouldnottalkaboutit

esahas.com

ज्यांना इनोव्हेटिव्ह सातारा शब्दाचे स्पेलिंग येत नाही, त्यांनी याबाबत बोलू नये

लोकांच्या हितासाठी काम करण्याची आमची एक पध्दत आहे. आमची धडाडी व लोकप्रियता खुपणाऱ्यांकडून आमच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. सहकारात स्वाहाकार करणारे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशा घणाघाती शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आरोपांना नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.