thestruggleofsharmacoupleinsataraisinspiring:nandkumarphadke

esahas.com

साताऱ्यातील शर्मा दांपत्यांचा संघर्ष प्रेरणादायी : नंदकुमार फडके

वयाच्या पाचव्या वर्षी अपघाताने कोपरापासून दोन्ही हात गमावलेल्या दिनेश शर्मा यांनी स्वतःच्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक, व्यावसायिक व वैवाहिक जीवनात उल्लेखनीय यश संपादन केले. या वाटचालीत त्यांची पत्नी नितू शर्मा यांनी दिलेली साथ कौतुकास्पद असून या दांपत्यांचा संघर्ष व त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार  साताऱ्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदकुमार फडके यांनी काढले.