thestatewillprotestagainsttheattackonarchitectbhandariwithblackribbonstoday

esahas.com

राज्यभरात आर्किटेक्ट भंडारी यांच्यावरील हल्ल्याचा आज काळ्या फिती लावून करणार निषेध

कराड येथे आर्किटेक्ट जितेंद्र भंडारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या कराड केंद्राकडून यापूर्वीच निषेध व्यक्त करुन लोकप्रतिनिधीना निवेदनही दिली आहेत. आता या घटनेची गंभीर दखल दि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या महाराष्ट्र विभागाने घेतली असून उद्या गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी  राज्यभरातील आर्किटेक्टस दिवसभर काळी फीत बांधून या हल्ल्याचा निषेध करणार आहेत.